भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, कांदा ही पिके जोरात बहरली आहेत. सदरील पिकांना पाणी देण्यासाठी रात्रीची लाईट असल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजास्तव रात्री अपरात्री शेतात जाऊन पिकांना पाणी देणे धोक्याचे झाले आहे. चेतन बोराडे शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे उपजिल्हाप्रमुख व युवासेना प्रमुख धाराशिव तसेच भूम तालुकाप्रमुख अनिल शेंडगे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
भूम तालुक्यातील शेतीची विद्युत लाईट रात्रीची न ठेवता दिवसा ठेवणे बाबत. भूम तालुक्यात बिबट्या व बिबट्या सदृश पाहण्याचा तात्काळ बंदोबस्त करणे बाबत. बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेले शेतकरी व जनावरे यांचे नुकसान भरपाई तात्काळ स्वरुपात देणे बाबत. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय (महसूल )भूम,वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय भूम, महावितरण अधिकारी कार्यालय, भूम या कार्यालयात निवेदन देण्यात आले.
भूम तालुक्यातील अनेक दिवसापासून बिबट्या व बिबट्या सदृश प्राण्यांचा उद्रेक मोठ्या प्रमाणत वाढला आहे, त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. आज दिनांक 12/12/2024 रोजी पहाटेच्या सुमारस मौजे मात्रेवाडी शिवरात बिबट्या सदृश प्राण्याने बापूराव सोमनाथ माने या शेतकऱ्यावर जीवे घेणा हल्ला झालेला असून त्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेले आहेत. तसेच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जनावरांवर हल्ला करून गंभीर जखमी केलेले आहे. तरी सदरील जखमी झालेल्या शेतकऱ्यांना व जनावारंना आपल्या स्तरावर पाठपुरावर करून शासनामार्फत लवकरत लवकर नुकसान भरपाई मिळावी.खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी पौळ साहेब यांना फोन करून बिबट्या पकडण्यासाठी लागलीच रेस्क्यू टीम बोलवावी असे सांगीतले आहे.
भूम तालुक्यातील शेतातील विद्युत लाईटचा दिवसभर पुरवठा नियमित करावा व सदरील हिंसक प्राण्याचा तात्काळ बंदोबस्त करण्यात यावा तसेच सदरील शेतकऱ्यांना झालेली नुकसान भरपाई तात्काळ स्वरुपात मिळावी. अन्यथा वरील मागण्या मान्य न झाल्यास व शेतकऱ्याच्या जीवितास धोका झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येतील व होणाऱ्या परिणामास आपले प्रशासन जबाबदारी राहील. या मागणीच्या निवेदनावर अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.