तुळजापूर (प्रतिनिधी) - श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या नवीन विकास आराखड्याच्या कामासंदर्भात बैठक सोमवार दि23 डिसेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी मैनक घोष यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत मंदिर संस्थानच्या नवीन विकास आराखड्याच्या कामासंदर्भात सविस्तर चर्चा झाली.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील, उपविभागीय अधिकारी संजयकुमार ढवळे, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक श्रीमती माया माने, सहायक व्यवस्थापक (स्थापत्य) राजकुमार भोसले व कंत्राटदार कंपनीचे अधिकारी आदी उपस्थित होते. कंत्राटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ काँफेरेन्स च्या माध्यमातून मिटिंग मध्ये कामाच्या विविध टप्प्यांचे सादरीकरण केले. बैठकीनंतर जिल्हाधिकारी मैनक घोष व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी कामाची प्रत्यक्ष पाहणी केली.