भूम (प्रतिनिधी)- मे महिन्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचे अनुदान वाटप न केल्यामुळे स्वतःच्या घराच्या वर जाऊन अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न शेतकरी महादेव खराडे यांनी केला होता. तहसीलदार यांनी लेखी दिल्यानंतर आत्मदहन मागे घेण्यात आले.
मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला होता. या अवकाळी पावसामध्ये भूम तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसान भरपाईची यादी तहसील कार्यालयामध्ये तयार आहे. काही शेतकऱ्यांची केवायसी करणे बाकी असल्यामुळे अनुदान वाटप होत नाही. आरसोली येथील महादेव खराडे यांचे मे महिन्यामधील नुकसान झालेल्या यादीमध्ये नाव आहे. परंतु केवायसी झाले असल्यामुळे तांत्रिक अडचणी येत आहेत. तांत्रिक अडचण दूर झाल्यानंतर खराडे यांची अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येईल. असे तहसीलदार जयवंत पाटील यांनी सांगितले.
 
