भूम (प्रतिनिधी)- येथील ग्रामदैवत श्री क्षेत्र अलम प्रभू च्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक ,सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ही यात्रा शनिवार दिनांक 21 ते सोमवार दिनांक 23 यादरम्यान संपन्न होणार आहे. 

शनिवार दिनांक 14 रोजी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त जयंती नंतर गुरुवार दिनांक कोटीचा बाजार संपन्न होणार आहे. यावेळी कोटीची नंदीवरून परंपरेनुसार मिरवणूक दुपारी चार वाजता मुख्य बाजारपेठेतून काढण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवार दिनांक 21 रोजी श्रींची रथावरून मिरवणूक सायंकाळी सहा वाजता काढण्यात येणार आहे. त्यानंतर आठ वाजता शोभेच्या दारूचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री साडेआठ वाजता चांडाळ चौकटीच्या करामती फेम बाळासाहेब अर्थात ह भ प भरत महाराज शिंदे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. रविवार दिनांक 22 रोजी गरुड देवाची सकाळी नऊ वाजता श्रीकृष्ण मंदिर कसबा ते नगरपालिका यादरम्यान मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी सहा वाजता श्रींची काळवीटावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दरम्यान गांधी चौक येथे मल्लखांब व काठी फिरवणे हा कार्यक्रम होणार आहे. रात्री आठ वाजता शोभेची दारू उडविण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास युवा लावणी सम्राज्ञी पुनम कुडाळकर यांचा तुमच्यासाठी काय पण हा भारदस्त लावण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवार दिनांक 23 रोजी पहाटे सव्वा दोन वाजता श्रींची गरुडावरून प्रथम मधून मिरवणूक काढण्यात येणार आहे. दुपारी बारा वाजता श्रीक्षेत्र अलम प्रभू येथे महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दुपारी दोन ते पाच वाजण्याच्या दरम्यान जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता श्रींची सिंहावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. रात्री आठ वाजता शोभेची दारू सोडविण्यात येणार आहे. त्यानंतर साडेआठ वाजता बारा गावच्या अप्सरांचा लावण्य चंद्रा हा दुरंगी लावण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंगळवार दिनांक 24 रोजी पहाटे तीन वाजता श्रींची सिंहावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी सात वाजता श्रीक्षेत्र आलमप्रभू येथे आरती होऊन यात्रेची सांगता होणार आहे. रविवार दिनांक 22 रोजी शोभेची दारू ओंकार चौकात उडविण्यात येणार आहे. इतर सर्व मनोरंजनाचे कार्यक्रम व शुभेच्छा दारू श्री गुरुदेव दत्त हायस्कूल येथे संपन्न होणार आहेत. त्याचा भाविक भक्तांनी लाभ घेण्याचे आवाहन विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष दिलीप शाळू व इतर सदस्यांनी केले आहे.

 
Top