धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील मुद्रा सहकारी पतसंस्था म. धाराशिव च्या 2025 या वर्षाच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संस्थेचे अध्यक्ष, संचालक आणि संस्थेचे सभासद यांच्या हस्ते करण्यात आले. 

यावेळी संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वि. भालेकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले कि, आपली संस्था दि.01 जानेवारी 2025 मध्ये आठव्या वर्षात यशस्वी पदार्पण करत आहे. संस्थेचे सभासद हे आमचे दैवत असुन सभासदांसाठी जास्तीत जास्त आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सेवा सुविधा देण्याचा संस्थेचा मानस आहे. ठेवीचे संरक्षण व कर्जाची वसुली यावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे. याप्रसंगी त्यांनी उपस्थित सभासदांचे आभार व्यक्त केले. यावेळी संस्थेचे सभासद सुधीर डोरले, सुधीर डोलारे, प्रथमेश साळुंके, मनोज लोकरे, रणजित सस्ते, संजय जाधव, प्रा. ठोबळ सर, सचिन चौधरी, अमोल चौधवी, संचालक श्री विनोद शेरकर, बलराम माने, व्यवस्थापक खंडेराव कवडे व कर्मचारी, खातेदार उपस्थित होते.


 
Top