धाराशिव (प्रतिनिधी)- अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था खडकी या संस्थेच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे माहेरकडील वंशज व महाराष्ट्र विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त नळदुर्ग येथील भटके विमुक्त विकास परिषद मार्फत चालविण्यात येणाऱ्या पालावरची शाळा या शाळेस अजिंक्य संस्थेच्या वतीने शाळेस टेबल खुर्ची ब्लॅकबोर्ड (फळा) व लहान मुलांना वही पेन पेन्सिल पाटी व इतर शैक्षणिक साहित्य देण्यात आले.

यावेळी संस्थेचे सचिव राम जवान बोलताना म्हणाले की, भटके विमुक्त विकास परिषद ही राज्यभरामध्ये भटक्या विमुक्त समाज बांधवांना एकत्रित करून त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नळदुर्ग या ठिकाणी भटकी विमुक्त विकास परिषदेने पालावरची शाळा या उपक्रमांतर्गत भटकंती करणारे जे समाज बांधव आहेत. त्यांच्या मुलांना एकत्रित करून शिक्षणाचे धडे देण्याचे काम भटके विमुक्त विकास परिषद करीत आहे.येणाऱ्या काळामध्ये भटके विमुक्त विकास परिषद व अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्था खडकी यांच्या संयुक्त विद्यमाने तुळजापूर तालुका व धाराशिव जिल्ह्यातील भटक्या विमुक्त बांधवांच्या मुलांना शैक्षणिक साहित्य व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणार आहे कारण भारत देश स्वतंत्र होऊन जवळपास 78 वर्षे झाले. पण आजही भटका विमुक्त समाज वर्षानुवर्ष आपल्या रूढी परंपरा नुसार व्यवसाय करत आहे शिक्षणाचे महत्त्व या समाजामध्ये कमी आहे. या समाजाने छत्रपती शिवरायांपासून ते भारताच्या स्वतंत्र लढ्यापर्यंत या समाजाचे योगदान खूप मोठे आहे. परंतु स्वातंत्र्याच्या काळानंतर या समाजामध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी असल्याने लहान मुलाचे खूप नुकसान होत आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये शिक्षणावर भर देऊन या मुलांना शैक्षणिक प्रवाहात आणून यांचे सामाजिक शैक्षणिक उद्योग व्यवसाय व आधुनिक करणाचे जोड देऊन भविष्यात या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

यावेळी भटके विमुक्त विकास परिषद या परिषदेच्या पालावरील शाळेच्या शिक्षिका मीराताई मोटे यांनी अजिंक्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था खडकी या संस्थेचे शैक्षणिक साहित्य दिल्याबद्दल व उपक्रम घेऊन मुलांना मार्गदर्शन केल्याबद्दल अजिंक्य संस्थेचे आभार मानले यावेळी भटके विमुक्त विकास परिषद धाराशिव जिल्हा संयोजक व अजिंक्य संस्थेचे सचिव राम जवान शिक्षिका मीराताई मोटे शिक्षका वर्षा ताई सोमवंशी तानाजी धुते संतोष जवान मेघराज सुरवसे आकाश धर्मे यांच्यासह भटके विमुक्त पालावरील विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top