मुरुम (प्रतिनीधी)- अखिल महाराष्ट्र मध्यवर्ती गुरव समाज परिषद, पुणे, सोलापूर जिल्हा सकल गुरव संस्था, वेळापूरकर यांच्या सहयोगातून गुरव बंधुंच्या स्मरणार्थ नुकताच ज्येष्ठ विचारवंत परिवर्तनवादी चळवळीतील बिनीचे संघर्ष योद्धा आदरणीय डॉ. बाबुराव गुरव, तासगाव यांच्या अध्यक्षतेखाली समाजातील मान्यवरांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले.

ठाणे, मुंबई, पुणे, संभाजीनगर, अमरावती, पिंपरी चिंचवड, पेन रायगड, आष्टी येथे कार्य करत असणाऱ्या संस्थांचा यथोचित सन्मान करण्यात आला.

धाराशिव जिल्ह्यातील महेश मोटे, ऍड. स्वाती नळेगावकर आणि रवी तीर्थकर यांचा संघर्ष योद्धा पुरस्काराने  यथोचित गौरव केला. बालरोगतज्ञ डॉक्टर नामदेव बिराजदार आणि त्यांचे पिताश्री लातूर जिल्हा परिषद सदस्य तथा विद्यमान सरपंच यांना समाजभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सन्माननीय हरिश्चंद्र धोत्रे, उद्योजक तथा अध्यक्ष एमआयडीसी ,कोल्हापूर माननीय बाळासाहेब गुरव ,कवठेमंकाळ, माननीय चंद्रकांत पुजारी माननीय शशिकांत पाटील खरसुंडी, पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा ओबीसी चळवळीचे नेते सुनील गुरव,माननीय भानुदास पानसरे ,पुणे यांचाही याप्रसंगी गौरव करण्यात आला.

संभाजीनगर लोकमतचे सन्माननीय स.सो .खंडाळकर यांनी समाजातील समस्यांचे आकलन करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत आपण ओबीसी म्हणून एक झाले पाहिजे असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबुराव गुरव यांनी उपस्थित समाज बांधवांना आपण कोण आहोत ? हे स्वतःला ओळखून शिक्षणाची कास  धरण्याचे आवाहन केले.

जोडी जमली साताऱ्याच्या कवयित्री सुरक्षा साखरे आणि कवी राजेंद्र गुरव औंध यांनी ओघवत्या शैलीत सूत्रसंचालन केले. आदरणीय प्रतापराव, आपण कामगारांच्या चळवळीत ,बारा बलुतेदार संघटनेत काम करता करता समाजासाठी झटताना समाजातील नेत्यांनी समाज संघटनेतून जाणीवपूर्वक परागंदा केले तरी अजूनही आपण समाजातील सर्वांना  कवेत घेत, सन्मानाची वागणूक देत समाजकार्य करू शकतो. हे या संपूर्ण महाराष्ट्रातील निवडक कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून ठळकपणे जाणवले.

प्रतिगामी विरुद्ध पुरोगामी असा अनादी संघर्ष झडत असताना चळवळीतील नेत्यांच्या हत्या होत असताना आपल्याही समाजातील आदरणीय डॉक्टर बाबुराव गुरव आणि आदरणीय प्रतापराव गुरव  वंचित घटकांसाठी लढत असल्यामुळे, परिवर्तनवादी विचार मांडत असल्यामुळे मारेकऱ्यांच्या हिट लिस्टवर आहेत. डॉक्टर बाबुराव गुरव सरांना  पोलीस संरक्षण होतं अशा बाकाप्रसंगातही हे दोघे आपलं संघर्षमय काम जीवावर उदार होऊन अविरतपणे करतच आहेत.

आपलं हे काम निश्चितच समाजासाठी निस्वार्थपणे झोकून देणाऱ्या वर्तमानकालीन सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. 

या कामी प्रतापरावांचे कुटुंबीय सुविद्य पत्नी, मुलं ही पण तितकीच उत्साहात सहभागी होतात,साथ देतात हे पाहून आनंद झाला. जीवन गौरव पुरस्कार,मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार,, संघर्ष योद्धा पुरस्कार, आदर्श देवस्थान व्यवस्थापन पुरस्कार ,गुरव समाज बंधुता मित्र पुरस्कार, समाजभूषण पुरस्कारराने गौरविताना स्मृतीचिन्ह प्रत्येकाच्या नावासहित तयार करून शाल,स्मृतीचिन्ह देऊन महाराष्ट्रातील अनेक मान्यवर आणि संस्थांचा आपण केलेला गौरव हा समाजाच्या इतिहासातील मैलाचा दगड ठरेल.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वेळापूर या आपल्या जन्मगावी अर्धनारी नटेश्वर महादेव मंदिरातील आपण  निमंत्रित केलेल्या  ज्येष्ठ, महिला, युवक, उद्योजक समाज बांधवांचा केलेला सन्मान चिरंतन स्मरणात राहील. अतिशय नियोजनबद्ध कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आदरणीय प्रतापराव गुरव यांचा सत्कार लातूर जिल्हा परिषदेचे सदस्य तथा सरपंच आदरणीय धोंडीराम बिराजदार यांनी सत्कार केला.

आदरणीय प्रतापरावजी,अथक परिश्रम घेऊन आपण माझ्यासहित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव केल्याबद्दल गौरव करून सुरुची भोजन दिल्याबद्दल पुनश्च अभिनंदन! मनःपूर्वक आभार ! 

(कार्यक्रम झालेल्या दिवसापासून सतत व्यस्त असल्याने  अभिनंदन आणि आभार व्यक्त करण्यास उशीर झाला क्षमस्व!)

डॉ. रमाकांत पाटील,

कलदेव निंबाळा,

जिल्हा -धाराशिव.

 
Top