तुळजापूर (प्रतिनिधी)- तिर्थक्षेञ तुळजापूर शहराला नळदुर्ग स्थित  बोरी प्रकल्पातुन पाणीपुरवठा करणारी मुख्य मोठी पाईप लाईन तिर्थब्रुद्रक येथे फुटल्याने शहराचा अर्धा भागाला मंगळवार  दि.10 डिसेंबर रोजी होणारा पाणीपुरवठा होणार नाही.

नळदुर्ग स्थित बोरी प्रकल्पातुन तीन फुट रुंदीचा लोखंडी पाईप लाईन मधुन शहराला पाणी पुरवठा होता. माञ मुख्यच पाईप लाईन सोमवार दि. 9 डिसेंबर रोजी दुपारी  फुटल्याने मंगळवार दि. 10 डिसेंबर रोजी मंगळवार पेठ, घाटशीळ रोड, एसटी कॉलनी, नळदुर्ग रोड, पुजारी नगर इत्यादी भागामधील पाण्याच्या टाकीवरून सोडण्यात येणारे पाणी पाईपलाईनची दुरुस्ती झाल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. तसेच  बुधवार दि.11 डिसेंबर रोजी शुक्रवार पेठ धाराशिव रोड, उद्धवराव पाटील इत्यादी भागांमधील सोडण्यात येणारे पाणी पाईप लाईनची दुरुस्ती झाल्याशिवाय सोडण्यात येणार नाही. अशी माहिती नगरपरीषद  पाणीपुरवठा  विभागाने दिली.


दुरुस्ती काम वेळखाऊ !

ही मुख्य मोठी पाईप लाईन असुन याचे साहित्य मुंबई पुणे येथे मिळते. तसेच दुरुस्तीसाठी अनुभव प्राधिकरणाचेच कामगार लागतात. तसेच सदरील पाईप लाईन शेतात असल्याने खालचा भाग खोलगट असल्याने येथे  पाणी साचले आहे. या पार्श्वभूमीवर पाईप लाईन दुरुस्ती कामास एक -दोन दिवस लागणार असल्याने पाईप लाईन दुरुस्ती होइपर्यत शहराला पाणीपुरवठा करता येणार नाही.


 
Top