तुळजापूर (प्रतिनिधी)-  श्री तुळजाभवानी शाकंभरी नवरात्र महोत्सव शके 1946 भारताची भारतमाता व महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी श्रीक्षेत्र तुळजापूर जि. धाराशिव येथे प्रतिवर्षाप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर तर्फे यंदाच्या शाकंभरी नवरात्र  महोत्सव  7 जानेवारी ते 14 जानेवारी या कालावधीत संपन्न होणार आहे. या शाकंभरी नवराञ उत्सव धार्मिक विधी कार्यक्रम आज शाकंभरी नवराञोत्सव बैठकीत जाहीर करण्यात आली.

शाकंभरी नवराञ उत्सव धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे-  शाकंभरी नवराञ उत्सव पुर्वीच्या मंचकि निद्रेस मंगळवार दि. 31 डिसेंबर रोजी राञी आरंभ होणार आहे. पौष शुध्द 8 शके 1946 मंगळवार दि. 7 जानेवारी रोजी पहाटे श्री देविजीची सिंहासनावर प्रतिष्ठापना, घटस्थापना दुपारी 12:00 वा ब्राम्हणास अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्रौ छबीना. बुधवार दि. 8 जानेवारी रोजी देविजींची नित्योपचार पुजा, रथ अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. गुरुवार दि. 9 जानेवारी रोजी देविजींची नित्योपचार पुजा, मुरली अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. शुक्रवार दि. 10 जानेवारी रोजी श्री देविजींची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. शनिवार दि. 11 जानेवारी रोजी सकाळी जलयात्रा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. रविवार दि.12 जानेवारी रोजी  अग्नी स्थापना, शतचंडी होमहवनास सुरुवात,  श्री देविजींची नित्योपचार पूजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा व रात्रौ छबीना. सोमवार दि. 13 जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमा, श्री देविजींची नित्योपचार पूजा, दुपारी 12 वाजता पुर्णाहुती, घटोत्थापन, रात्रौ छबीना व जोगवा. मंगळवार दि. 14 जानेवारी रोजी श्री देविजींची नित्योपचार पुजा, दुपारी अन्नदान, महाप्रसाद रात्रौ छबीना मकरसंक्रांत, रात्री संक्रांत पंचांग श्रवण/वाचन तरी या सोहळ्याचा लाभ घेण्याचे आवाहन श्रीतुळजाभवानी संस्थानचे  श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी, विश्वस्त तथा उपविभागीय अधिकारी, विश्वस्त तथा तहसिलदार तथा व्यवस्थापक प्रशाषण सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थान तुळजापूर यांनी केले आहे.

 
Top