तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील आपसिंगा कामठा शिवारात एका शेतकऱ्याचा शेतातील वासरू बिबट्याने खाल्याची घटना मंगळवार दि. 24 डिसेंबर रोजी पहाटे उघडकिस आली.
या बाबतीत अधिक माहीती अशी की, कामठा शिवारात अहमद शेख यांची शेती असुन त्यांच्या शेतात असलेले गाईच्या वासरावर हल्ला करुन अर्ध खावुन टाकले. या घटनेनंतर या परिसरात भितीचे वातावण पसरले आहे. वनविभाग अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जावुन पाहणी करुन पंचनामा केला. या बाबतीत रानावनात वावरताना दक्षता घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.