तुळजापूर (प्रतिनिधी)- तालुक्यातील तिर्थ (खुर्द) येथे बालाजी गणपत भुसणे डांगे, रा. तुळजापूर येथील जमीन गट नं. 125 मध्ये मे. रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा.लि. या पवनचक्की कंपनीचे कर्मचारी संभाजी माधव दंडगुले रा. किल्लारी ता. औसा जि.लातूर हे इतर कर्मचारी मार्फत अतिक्रमण करुन माती व मुरुम काढून खोदकाम करणे व बेकायदेशीरपणे वाहने घालून रस्ता तयार करुन जमीनीचे नुकसान केले. बाबत मला शिवीगाळ करुन दमदाटी करुन जिवे मारण्याची धमकी दिली असल्याने या प्रकरणी कारवाई करुन मला न्याय द्यावा. अन्यथा मला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही असे निवेदन पोलिस अधीक्षक धाराशिव यांना दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे कि, मी तिर्थ (खुर्द) ता. तुळजापूर जि.धाराशिव येथील रहिवाशी असून, माझ्या मालकीचे मौजे तिर्थ (खुर्द) ता.तुळजापूर जि.धाराशिव येथील जमीन गट नं. 125 मध्ये क्षेत्र 01 हे 22 आर, एवढी शेतजमीन आहे. तरी सदरील मे. रिन्यू ग्रीन एनर्जी सोल्युशन प्रा.लि. या पवनचक्की कंपनीने माझ्या मालकीच्या शेतजमीनीपैकी 00 हे 35.5 आर, एवढे क्षेत्र दिनांक 08/09/2022 रोजी भाडेकरार दस्त क्र. 3748/2022 अन्वये भाडयाने घेतलेली होती व मला रक्कम रु.2,66,000/- इतकी रक्कम दिलेली होती. सदर कंपनीने खरेदीखत दस्त क्र. 3222/2018 मध्ये नमूद केलेल्या जमीनीच्या चतु:सिमा ह्या पुर्वेस- गायरान जमीन (वन विभाग). पश्चिमेस-यापैकी आण्णासाहेब भिमराव भुसणे यांची जमीन. दक्षिणेस-या भु.क्र. पैकी बालाजी गणपत भुसणे यांची जमीन. उत्तरेस-आनंदराव त्रिमुर्ती जमदाडे यांची जमीन. अशी आहे. असे असताना सदर कंपनीने याच जमीनीचे पुढे खरेदीखत दस्त क्र. 3747/2022 हा दस्त केला असून, त्यामध्ये सदर जमीनीच्या चतु:सिमा ह्या पुर्वेस-सदर गटातील उर्वरित जमीन. पश्चिमेस-सदर गटातील उर्वरित जमीन. दक्षिणेस-सदर
गटातील उर्वरित जमीन. उत्तरेस-सदर गटातील उर्वरित जमीन. असे चुकीचे नमूद केलेले आहे. अशा प्रकारे बनावट दस्त तयार करुन माझी फसवणुक केलेली आहे. सोबत दोन्हीं दस्तातील चतु:सिमेची प्रत जोडत आहे.
तरी सदरील कंपनीने भाडयाने घेतलेल्या 35.5 आर एवढ्या क्षेत्रावरती त्यांचे प्रकल्प उभा करणे आवश्यक होते. परंतू सदरील कंपनीने त्यांच्याकडे असलेल्या पैशाच्या जोरावर तसेच मनुष्यबळाच्या जोरावरती कंपनीचे कर्मचारी संभाजी माधव दंडगुले रा. किल्लारी ता. औसा जि.लातूर हे इतर कर्मचारी मार्फत माझ्या मालकीच्या 60 आर, एवढ्या क्षेत्रावरती अतिक्रमण करुन तेथील सुपिक जमीनीतील काळी माती व मुरुम काढून नेवून तेथे खोदकाम करीत आहेत. तसेच मोठे अवजड वाहने ने-आण करुन तेथे बेकायदेशीरपणे तयार करुन माझ्या जमीनीचे अतोनात असे नुकसान करीत आहे. त्याबाबत त्यांना मी वारंवार बेकायदेशीरपणे अतिक्रमण करुन जमीनीचे नुकसान न करणे बाबत विनंती केली. परंतू कंपनीचे कर्मचारी संभाजी माधव दंडगुले रा. किल्लारी ता. औसा जि.लातूर तसेच कर्मचारी हे राजकीय व्यक्तींमार्फत माझ्यावर गुंडगिरी करुन माझ्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करुन उलट मला दमदाटी करुन मला माझ्या जमीनीतून कायमस्वरुपी बेदखल करण्याची तसेच जिवे मारण्याची धमकी देत आहेत.
सदर कंपनीच्या बेकायदेशीर कृत्यामुळे माझ्या जमीनीचे अतोनात असे नुकसान होत असून, सदर कपंनीच्या कर्मचारी व अधिकारी यांच्या दमदाटी व दहशतीमुळे मला माझ्या जमीनीमध्ये जाणे-येणे कठीण झालेले आहे. त्यामुळे माझी जमीन ही नापिक होवून मी व माझ्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी मे. साहेबांना विनंती आहे की, वर नमूद कंपनीकडून होत असलेला गैरकृत्यास तात्काळ थांबवून कंपनीकडून माझ्या जमीनीचे झालेले नुकसानीची भरपाई मला देण्यात यावे व माझ्या जमीनीवरील अतिक्रमण काढून मला माझी जमीन मोकळी करुन देण्यात यावी. सदरील कंपनीवरती योग्य ती कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येवून मला न्याय द्यावा, अन्यथा माझ्यावरती आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. त्याबाबत मी उपोषण तसेच पिडीत शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करणार आहे.