धाराशिव (प्रतिनिधी) - आजकाल आपल्या उत्पादनांची जाहिरात करण्याचा नवा ट्रेंड रुजताना दिसून येत आहे यामध्ये सौंदर्य प्रसाधनाच्या फसव्या जाहिरातीवर अधिकच भर दिसतो आहे त्यामुळे ग्राहकांना आर्थिक नुकसानाची झळ बसताना दिसून येते असल्याचे मत ग्राहक संरक्षण च्या जिल्हा संघटक पुनम तापडिया यांनी व्यक्त केले. त्या धाराशिव प्रशाला येथे ग्राहक संरक्षण सप्ताह निमित्त बोलत होत्या. यावेळी प्रमुख उपस्थिती मेघा कुलकर्णी,रवी पिसे, प्रशालेचे मुख्याध्यापक पंडित जाधव,मोहन सुरवसे तसेच प्रशालेचे शिक्षक उपस्थित होते.

पुढे बोलताना तापडिया म्हणाल्या की ग्राहकांची फसवणूक होऊनही ग्राहक त्याकडे दुर्लक्ष करतो.आपण जे प्रॉडक्ट घेतले त्यासाठी आपण जी 100-200 किंवा हजार रुपये किंमत मोजतो. परंतु या प्रॉडक्ट मध्ये जे दावे करण्यात आले त्याचा फायदा झाला नाही. यासाठी न्यायालयात जाव घेण्याशिवाय सामान्य ग्राहकांना पर्याय नाही शिवाय न्यायालयात धाव घेणे म्हणजे मानसिक त्रास शिवाय आर्थिक हानी यामुळे सर्वसामान्य ग्राहक तक्रार करत नाही. त्यामुळे अशा कंपन्यांचे चांगलेच फावत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

टीव्ही व सोशल मीडिया च्या माध्यमातून कारखानदार आपल्या वस्तूची फसवी जाहिरात देऊन ग्राहकांची आर्थिक फसवणूक करण्यात पटाईत झाले आहेत. यामुळे ग्राहकांनी वास्तवता पहावी तसेच त्यामध्ये असलेले घटक त्यामुळे होणारे परिणाम दुष्परिणाम हे ग्राहकांनी पाहूनच कोणतीही वस्तू खरेदी करावी असे आवाहन त्यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन चंद्रकांत माळी यांनी मानले.


 
Top