तुळजापूर (प्रतिनिधी) - तालुक्यातील बारुळ व मेसाई येथील प्रकरणी पोलिसांनी केलेली कारवाई समाधान कारक नाही असे स्पष्ट करुन पवनचक्की कंपन्यांकडुन शेतकऱ्यांची अडवणूक होते. कंपन्यांनी दलाल ऐवजी थेट शेतमालकांना मोबदला द्यावा. पवनचक्की कंपनी सीएसआर फंड दलालांचा हाती न देता ग्रामविकासासाठी ग्रामपंचायतला द्या, अशी मागणी विशाल रोचकरी सचिन ठोंबरे यांनी पञकार परिषद घेऊन केली .
या पञकार परिषदेला संबोधीत करताना सचिन ठोंबरे व विशाल रोचकरी म्हणाले कि, आमची जादा जमीन कंपनीने घेऊन अन्याय केल्याचा आरोप केला. या प्रकरणी विशाल रोचकरीमुळे मी हा लढा उभा केल्याचे स्पष्ट केले. आम्ही जवळगा मेसाई, बारुळ पवनचक्की प्रकरणी पोलिस निरक्षकावर कारवाई करण्याचे मागणी निवेदन दिले पण यात त्यांनी पोलिस निरक्षकांनाच अभय दिल्याचे सांगितले. यावेळी प्रकरणी बोलताना विशाल रोचकरी म्हणाले कि, भाजपचे दोन ते तीन नेते हे प्रकरण मला मिटवुन घ्या म्हणत होते. पण मी त्यांना सांगितले कि तुमच्यावर अशी वेळ आली असती तर मिटवुन घ्या म्हटलं असते का? शेतकऱ्यांवर अन्याय होताना मी कसे मिटवुन घेऊ असे त्यांना सांगितल्याचे यावेळी म्हणाले. यावेळी मेसाई जवळगा प्रकरण कसे मिटले असे विचारणा केली असता घटना 27/11/2024 रोजी घडली पण त्या प्रकरणी आजपर्यंत काहीही झाले नाही असा खुलासा यावेळी केला. तालुक्यातील पवनचक्की कंपन्यांनी सीएसआर फंड दलालांचा हाती न देता ग्रामपंचायतला द्या अशी मागणी केली. शेतकऱ्यांना न्याय न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचे यावेळी स्पष्ट केले.
यावेळी कंपनी वतीने या आरोपास उत्तर देताना, एस. वनवे अग्रीगेटर श्रीनियन एनर्जी प्रा. लि. मुंबई यांनी या आरोप प्रकरणी खुलासा करताना म्हटलं आहे की, कंपनी विरोधात केलेले आरोप निराधार असुन बाधीत शेतकऱ्यांच्या सर्व रक्कमा आम्ही त्यांना अदा केल्या आहेत. कंपनी काम पुर्ण झाल्यानंतर 75000 रुपये रक्कम चेक लावण्याचे ठरलेले असताना तो आम्हाला कसलीही सुचना न देता लगेच लावला. तो बाँऊन्स झाला. तरीही सदरील चेकपोटीरुपये रक्कम आजही कंपनी देण्यास तयार आहे. आम्ही कुणावर ही आजपर्यत अन्याय केला नाही. या पुढे ही शेतकऱ्यांनावर तर कधीच करणार नसल्याचा खुलासा एस वनवे अग्रीगेटर श्रीनियन एनर्जी प्रा लि मुंबई यांनी केला.