धाराशिव (प्रतिनिधी)-  19 गोवंशीय जनावरांची वाहतूक करणारे दोन टेम्पो पोलिसांनी पकडून तिघांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. ही कारवाई आंबी पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

आंबी पोलीस ठाणेचे पोलिस पेट्रोलिंग करत असताना देवगाव बु. ता. परंडा शिवारामध्ये दोन टाटा कंपनीचा पांढरे रंगाचा टेम्पो क्र. एमएच 11 एएल 7092 व आयशर टेम्पो क्र. एमएच 13 ए 3640 येत असल्याचे पोलीस पथकास दिसून आले. सदरील वाहनाच्या चालकास गाडी थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकांनी गाड्या रोडच्या बाजूला उभ्या केल्या. सदरील वाहने ही पोलीस ठाणे आंबी येथे आणुन वाहन चालकास त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे सोहेल राजु कुरेशी, जगन्नाथ पंढरीनाथ साळवे, रिहाण सिराज कुरेशी सर्व रा. राशीन, ता. कर्जत जि. अहिल्यानगर असे सांगितले. पोलीस पथकाने सदर वाहनाचे निरीक्षण केले असता वाहनांमध्ये अत्यंत दाटीवाटीने त्यांचे सुरक्षतेची कोणतीही काळजी न घेता असुरक्षीतपणे सदर गाडीत गोवंशीय जनावरे भरले असल्याचे निदर्शनास आले. सदर वाहनांमध्ये 19 गोवंशीय जातीच्या गायी एकुण 3 लाख 80 हजार किंमतीच्या वाहनासह असा एकुण 17 लाख 80 हजार किंमतीचे मिळून आले. त्यावरुन पोलीस ठाणे आंबी येथे गुन्हा नोदंवला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी हिरेमठ, आंबी पोलीस ठाण्याचे  सहाय्यक पोलीस निरीक्षक खरड, पोलीस हावलदार खुणे, पोलीस नाईक राउत, पोलीस अंमलदार संदीप चौगुले यांचे पथकांनी केली आहे.

 
Top