उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा शहरातील प्रा. किरण सगर यांची मराठवाडा साहित्य परिषदेच्या केंद्रीय कार्यकारिणीवर निवडून आल्याबद्दल उमरगा तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक व रसिक वाचकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्रा सगर हे गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक यांच्यात वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवितात. वाचन चळवळीकरीता घेतल्या जाणाऱ्या उपक्रमात त्यांनी सातत्य राखले आहे. प्रकाशन संस्था-प्रकाशक व वाचक यांचेशी जोडून घेऊन वाचन संस्कृतीला हातभार लावल्याने प्रा सगर यांच्या विशेष सत्काराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी राज्य आदर्श शिक्षक कवी कमलाकर भोसले, लेखक हणमंत आलुरकर,राज्य आदर्श शिक्षक शिवराम मदने, कवी सुधाकर झिंगाडे,सविता सगर, मधुकर गुरव, प्रा. दादासाहेब सुर्यवंशी, बाळासाहेब माळी, शमीम सास्तुरे, विश्वनाथ महाजन, प्रा अभयकुमार हिरास, प्रा विजयकुमार जगताप , गुंडू दुधभाते, प्रा डॉ अवंती सगर, उद्योजक अनिल सगर यांच्यासह साहित्य प्रेमींची उपस्थिती होती.