धाराशिव (प्रतिनिधी)- देशाचे गृहमंत्री भाजप नेते अमित शहा यांनी संसदेमध्ये बोलताना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होईल असे वक्तव्य केले आहे. याच्या निषेधार्थ दि.19 डिसेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुणीकृती पुतळ्या समोर अमित शहा यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले.
तसेच बीड येथील मयत सरपंच संतोष देशमुख व परभणी येथील मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्याकांडातील दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी तीव्र निदर्शने करत भाजप विरोधी घोषणा देण्यात आल्या.यापुढे कोणत्याही भाजपाच्या नेत्याने महापुरुषाविषयी अवमानास्पद वक्तव्य केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशाराही यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला.
यावेळी काँग्रेसचे जिल्हा संघटक राजाभाऊ शेरखाने, उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत पाटील, डिसीसी बँकेचे संचालक मेहबूब पाशा पटेल,काँग्रेसचे शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, नगर परिषद मा.गटनेते सिद्धार्थ बनसोडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष आयाज शेख, शिवसेना शहरप्रमुख सोमनाथ गुरव, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, तालुकाध्यक्ष विनोद वीर, ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, सरचिटणीस जावेद काझी, नगरसेवक, रवि वाघमारे,राणा बनसोडे, अशोक पेठे, पंकज पाटील , प्रशांत साळुंके, पृथ्वीराज चिलवंत, शेखर घोडके, रणवीर इंगळे, महादेव माळी ,अभिमान पेठे, प्रेम सपकाळ, विद्यार्थी काँग्रेसचे कफिल सय्यद, सुनील बडुरकर, सचिन धाकतोडे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष धवलसिंह लावंड, गणेश असलेकर,बंडू आदरकर, सुरेश गवळी,अमित उंबरे, मनोज उंबरे सतीश लोंढे, सह्याद्री राजेंनिंबाळकर, हर्षद ठवरे, शहाजी पवार, अंकुश चौगुले, राकेश कचरे, राकेश सूर्यवंशी, मुजीब काझी, साबेर सय्यद, अन्वर शेख, अक्षय खळदकर, संदीप गायकवाड, राकेश सुर्यवंशी, शहराध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, संदीप शिंदे, महेंद्र शिंदे, अक्षय जोगदंड, नवज्योत शिंगाडे, शरीफ शेख यांचे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.