तुळजापूर (प्रतिनिधी) - तुळजापूरच्या आई भवानीचा पदस्पर्श झालेली कवड्यांची माळ आज आशीर्वाद म्हणून पदरात आली आहे. हा आशीर्वाद निश्चितच माझं बळ वाढवणार आहे. अशी भावना समाजसेविका ममता सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केली.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तुळजापूरचा योग निश्चित झालाय.आई म्हणजेच सिंधुताई सपकाळ अनेकदा तुळजाई नगरीत आल्या होत्या.माईंना मानणारा खूप मोठा वर्ग मराठवाड्यात आहे.मी कधीही तुळजाई नगरीत आले नाही. प्रथमच मला हिरकणी पुरस्काराच्या निमित्ताने आई श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासह माई परिवाराच्या सर्व सदस्यांना भेटायची ओढ लागली आहे अशी भावना ममता सिंधुताई सपकाळ यांनी बोलून दाखवली.

श्री क्षेत्र तुळजापूर येथे राज्यस्तरीय हिरकणी पुरस्कार सोहळा जानेवारी महिन्यात पार पाडतो आहे,या सोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी हिरकणी पुरस्कार समितीचे सदस्यांनी मांजरी पुणे येथील माईंच्या समंती बाल निकेतन संस्थेत जाऊन ममताताईंची भेट घेतली.

ममताताई सपकाळ यांचा आई तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद रुपी कवड्याची माळ,प्रतिमा देऊन सत्कार केला. याप्रसंगी पुजारी नगर फाऊंडेशन अध्यक्ष गणेश पुजारी,गोविंद डोंगरे,बाबा घोंगते,शिवशंकर भारती,हरिदास मदने,नागेश नरवडे,मुख्य संयोजक अनिल आगलावे उपस्थित होते.

 
Top