उमरगा (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते प्रादेशिक दुय्यम सेवा निवड मंडळ माजी सदस्य, श्री राष्ट्रीय शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक उप प्राचार्य शिवाजीराव वडणे वय 80 वर्षे यांचे गुरुवारी दि. 5 पहाटे मुंबईहून येताना प्रवासादरम्यान हृदय विकाराच्या सौम्य झटका आल्याने निधन झाले. ते प्रा. हेमंत वडणे (सदस्य -ग्राहक सेवा मंडळ, महाराष्ट्र माहिती अधिकार समिती) चे वडील होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. शहरातील हुतात्मा स्मारक स्मशान भूमीत अंत्य संस्कार करण्यात आले.

 
Top