धाराशिव (प्रतिनिधी)-अहमदिया मुस्लिम जमातची युवा शाखा मजलिस ख़ुद्दाम-उल-अहमदिया धाराशिवतर्फे श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात स्वच्छता कार्यक्रम राबवण्यात आला.
कार्यक्रमात स्थानिक क्रीडा अधिकारी, युवा मार्शल आर्ट ऍथलीट, आणि विविध समुदाय सदस्य तसेच शहरातील मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदवला. यावेळी क्रीडा संकुलातील प्लास्टिक कचऱ्याची स्वच्छता करण्यात आली तसेच पर्यावरण संवर्धनासाठी जागरूकता निर्माण करण्यात आली.
कार्यक्रमाच्या समारोपाच्या वेळी कुराणातील स्वच्छतेविषयक वचनांचे वाचन करण्यात आले आणि भारतीय संविधानाची उद्देशिका सामूहिकपणे वाचली गेली.वक़ार-ए-अमल विभाग आणि मानव सेवा विभागाने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले आहेत, ज्यात रक्तदान शिबीर, अन्नदान आणि थंडीच्या दिवसांत गरजवंतांना रजई आणि गरम कपडे दिले जातात.क्रीडा अधिकारी कैलास लटके यांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवण्याच्या महत्त्वावर जोर दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पुढील मान्यवर उपस्थित होते: डॉ. बशारत अहमद (अहमदिया मुस्लिम जमातचे अध्यक्ष), राग़ेब अलीम (ख़ुद्दाम-उल-अहमदिया शहराध्यक्ष), अब्दुल लतीफ (अन्सार उल्लाह जिल्हा अध्यक्ष), अब्दुल अलीम (अन्सार उल्लाह शहराध्यक्ष), कैलास लटके (क्रीडा अधिकारी), भैरवनाथ नाईकवाडी (क्रीडा अधिकारी), समाजिक कार्यकर्ते गणेश रानबा वाघमारे,मक़बूल अहमद (प्रचारक अहमदिया मुस्लिम जमाअत) , बन्सोडे (माजी क्रीडा अधिकारी), मनोज पाटणगे (कराटे), सुरेश कळंबकर, तसेच, प्रभाकर जगदाळे, अब्दुल क़य्युम नासीर (चिटणीस वक़ार-ए-अमल),अब्दुस समद, अब्दुल नईम, नदीम अहमद, मुताहिर अहमद, सजील अहमद, आदिल अहमद, तौसीफ अहमद, शफीक अहमद, मंजुम अहमद ,अमित नागणे, राहुल बडवाणे, स्वामी सर, अशोक सावंत, साई, आणि इतर सदस्य.