धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा बैंक ऑफ महाराष्ट्र शाखा अंतर्गत असणाऱ्या दत्तक गावातील महिला बचत गटातील सदस्यांना बँकेच्या वतीने लाखो रुपये कर्ज वाटप “स्वयं सहायता बचत गट क्रेडिट लिंकिंग कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी पीक कर्ज नूतनीकरण, व्यवसाय कर्ज परतफेड , सुरक्षा बिमा बाबत योग्य मार्गदर्शन करून महिलांना प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना, अटल पेन्शन योजना,याबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.बँकेने आर्थिक मदत केलेल्या पैसातून महिलांनी उद्योग उभारले पाहिजेत.नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या महिला बचत गटाला बँक आर्थिक मदत करते.फक्त घेतलेले कर्ज नियमित वेळेत परतफेड करणे आवश्यक आहे. महिलांनी या बचत गटाच्या कर्जाचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे असे प्रतिपादन सोलापूर झोनल प्रबंधक संजीव कुमार यांनी केले.
बैंक ऑफ महाराष्ट्र सोलापूर झोनल ऑफिस अंतर्गत धाराशिव जिल्ह्यातील बैंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या महिला बचत गटाना एकूण सहा कोटी पाच लाख कर्ज वाटप कार्यक्रम धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालय भवन येथे (ता. 21) शनिवार रोजी दुपारी एक वाजता उत्सात संपन्न झाला.सर्व प्रथम दीपप्रज्वलन करून , सरस्वती च्या प्रतिमा चे पूजन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली.या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या महिला बचत गटातील शेकडो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रम प्रसंगी सोलापूर झोनल प्रबंधक संजीव कुमार,चीफ मॅनेजर महेंद्र कुमार, राजेश कुशवा, कृषी विभागप्रमुख वैभव घाडगे,युवराज केदार, एम.एस.आर. एल.एम.चे जिल्हा समन्वय समाधान जोगदंड, शोभा कुलकर्णी, आर्थिक साक्षरता समनव्यक श्री.भालेराव, शाखा व्यवस्थापक दीपक गवळी,योगेश कंदीले,अर्जुन गायकवाड,संदीप साबळे ,कृषी अधिकारी आबासाहेब भागवत,यांच्यासह अन्य शाखेचे शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक आदटराव ,आभार दीपक गवळी यांनी मानले.
“11 नोव्हेंबर 2024 ते 31 डिसेंबर 2024 या कालावधीत सुरू असलेल्या स्वयं सहायता गट क्रेडिट लिंकिंग अभियानाअंतर्गत सोलापूर झोनने 425 गटांच्या खात्यांसाठी एकूण 18 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे.यापैकी 21 डिसेंबर 2024 पर्यंत 13.30 कोटी रुपयांचे वितरण करण्यात आले असून उर्वरित रक्कम 31 डिसेंबर 2024 पूर्वी वितरित केली जाणार आहे.