तुळजापूर (प्रतिनिधी)-  तालुक्यातील  बारुळ येथील सचिन प्रभाकर ठोंबरे पाटील यांच्या शेतात पवनचक्की वाले अतिक्रमण करताना विरोध केला असता त्यांना मारहाण केली. याची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेलो असता तक्रार न घेतल्याचा निषेधार्थ सचिन प्रभाकर ठोंबरे या शेतकऱ्याने छञपती शिवाजी महाराज पुतळ्या जवळ शनिवार दि. 21 डिसेंबर रोजी उपोषण केले. यावेळी पोलिस निरक्षक रविद्र खांडेकर यांची बदली करुन, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पिढीत कुंटुंबियांनी केली.

माझी बारुळ शिवारात शेतजमीन असुन, मी शेती करून स्वताची व कुटुंबाची उपजिवीका भागवितो. पवनचक्की  कंपनीला पवनचक्की साठी गट नं. 81 मधील 20 गुंठे जमीन भाडेतत्वावर दिलेली आहे. सदर पवनचक्कीचे लोक 20 गुंठे जमीन न वापरता 30 ते 35 गुंठे जमीनीवर अतिक्रमण करुन काम करत आहेत. परंतु सदरील लोक हे दंडमशाही करून अतिक्रमण करतात. मोठया पवनचक्कीच्या गाडया माझ्या शेतातून घेवून जातात. सदरील कंपनी विरुध्द मोजणी करुन घ्यावी म्हणून आम्ही दिवाणी न्यायालय तुळजापूर येथे दावा 'दाखल केला आहे. यावरून वादविवाद होवून कंपनीच्या लोकांनी जबर मारहाण केली असे ठोंबरे यांनी यावेळेस सांगितले. यावेळी सचिन ठोंबरे याची पत्नी, लहान मुले, आईवडील, सामाजिक कार्यकर्ते विशाल रोचकरी बसले होते. यावेळी पोलिस निरीक्षक रविंद्र खांडेकर यांची बदली करुन त्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.


राणा पाटील ॲक्टीव्ह मोडमध्ये 

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर आल्यानंतर भाजपाचे तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दि. 22 डिसेंबर रोजी तुळजापूरमध्ये उपोषणस्थळी भेट देवून सचिन ठोंबरे यांना काय असेल ते लेखी द्या, मी पाहतो असे सांगितले. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख यांनी पवनचक्की कंपनीविरोधात तक्रार असल्यास लेखी द्या. योग्यती कारवाई करण्यात येईल असे सांगितले. 


 
Top