तुळजापूर - तीर्थक्षेत्र तुळजापूर शहरातील नवीन बसस्थानक रोडलगत चक्री जुगार अड्यावर पोलिसांनी छापा टाकुन चक्री जुगार सहित्य रोख रकमेसह १९,१५०रुपयाचा मुदेमाल जप्त केला ही कारवाई शुक्रवार दि२९ रोजी दुपारी ०१.५० वाजण्याच्या सुमारास केली. 

तीर्थक्षेत्र तुळजापुरात चक्री जुगार अड्यांचा सुळसुळाट वाढला असुन नवेजुने बसस्थानक मंदीर परिरासरात सरास जुगार अड्डे गेली अनेक महिन्या पासुन राजरोस चालु आहेत या चक्री जुगारास तरुण वर्ग बळी पडत आहेत. जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.२९ रोजी तुळजापूर येथील विश्वनाथ कॉर्नरकडुन नविन बसस्थानककडे जाणारे रोडलगत छापा टाकला. यावेळी राम बाबुराव टकले (रा.बसवंतवाडी), राजु उर्फ कैलास कुंडीबा मोहिते, (रा. गावठाण भागडे स्थळ काहेचीवाडी ता. खेड जि. पुणे ह.मु. हंगरगा पाटी ता. तुळजापूर) हे दोघे चक्री  जुगाराचे साहित्यासह एकुण 19,150  रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द तुळजापूर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.


 
Top