परंडा -  गेल्या मागील काही दिवसापासून  तालुक्यात बिबट्याने दहशत निर्माण केली असून शुक्रवार दि.29 रोजी मध्य रात्रीच्या सुमारास दुधी शिवारात शेतकरी विनोद जाधव यांच्या पाळीव गायीची मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने गायीवर हल्ला करून ठार केल्याची घटना  घडली. 

 बिबट्याने तायुक्यातील अनेक गावात दहशत निर्माण करून आत्ता पर्यंत जवळपास दहा बारा शेतकऱ्यांची पाळीव जनावरांचा फडशा पाडला आहे.यामुळे परिसरातील ग्रामस्थ शेतकरी भयभीत झाले आहेत. दुधी शिवारात शुक्रवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याने जाधव यांच्या गायीवर हल्ला केल्याची घटना शनिवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर ग्रामस्थांनी वनविभागाला कळवण्यात आले. वनविभागाच्या पथकाने पिंज-यासह तात्काळ घटना स्थळी दाखल होऊन घटने ठिकाणी पाहणी केली. बिबट्याच्या पंजाचे माग काढण्यासाठी पथक राणोमाळ फिरले मात्र बिबट्या पकडण्यास पथकाला यश आले नाही. बिबट्याच्या दहशतीमुळे ग्रामस्थ वं शेतकऱ्या मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.  

 
Top