धाराशिव - येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे माजी  प्राचार्य तथा श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे माजी सहसचिव डॉ .रमेश दापके यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर एम.सी.व्ही.सी विभागातील प्रा.पांडुरंग बंडेवार यांच्या सेवानिवृत्ती बद्दल सपत्नीक सत्कार करण्यात आला. 

     यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख म्हणाले की, डॉक्टर रमेश दापके यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत मी देखील त्यांचा विद्यार्थी आहे आणि ते माझे गुरु आहेत याचा मला अभिमान वाटतो. डॉ.दापके यांनी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या विकासात खूप मोठी भर घातलेली आहे.त्यांचे कार्य आपल्याला विसरता येणार नाही असेही ते यावेळी म्हणाले.मी स्वतः डॉ.दापके यांचा आणि या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.आणि याच हाविद्यालयामध्ये मला प्रशासक म्हणून कार्य करण्याची मोठी संधी मिळालेली आहे त्याबद्दल मी जीवनामध्ये धन्य झालो आहे. डॉ.रमेश दापके यांनी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे.त्यांचे आरोग्य उत्तम असून आज देखील त्यांचे साधे राहणीमान हेवा वाटणारे आहे. यापुढे  देखील डॉ. दापके यांना  उदंड आणि निरोगी आयुष्य मिळावे अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील त्यांनी यावेळी दिल्या. 

    प्रा.पांडुरंग बंडेवार यांच्या संदर्भात बोलताना प्राचार्य डॉ.देशमुख म्हणाले की,बंडेवार सरांचा सहवास सहा ते सात वर्षाचा आहे.सहवास जरी कमी असला तरी देखील या संस्थेशी  त्यांचे नाते खूपच घट्ट झाल्याचे दिसून येते.शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी दिलेली शिकवण आणि त्यांची तत्वे आत्मसात करून प्रा.बंडेवार यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे.त्यांना देखील यावेळी भावी आयुष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

     याप्रसंगी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ.रमेश दापके यांनी  सत्काराला उत्तर देताना आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.दापके म्हणाले की , या आमच्या मातृसंस्थेमध्ये प्रामाणिकपणे काम केल्यास आणि बापूजींची तत्वे अंगीकारल्यास शिक्षण क्षेत्रामध्ये व्यक्ती खूप मोठी झेप घेऊ शकते. प्राचार्य डॉ .जयसिंगराव देशमुख यांनी  रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचा चेहरा मोहरा बदलला आहे. ते या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. याचा आम्हाला अभिमान वाटतो असे ही  ते यावेळी म्हणाले.

प्रा.बंडेवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. या सत्कार बद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य तथा मराठवाडा विभाग प्रमुख प्राचार्य डॉ. जयसिंगराव देशमुख आणि श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे आभार मानले. प्रस्ताविक प्रा माधव उगिले यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार डॉ. वैभव आगळे यांनी केले.


 
Top