मुरूम (प्रतिनिधी)- येणेगूर येथील कॅप्टन जोशी स्मारक विद्यालयात भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आले.भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन श्री परमहंस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष देवराज बिराजदार, प्रशालेचे मुख्याध्यापक महेश हरके, गणित विभाग प्रमुख महेश खंडाळकर, प्रदीप शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
तसेच उमरगा गणित अध्यापक मंडळाच्या कार्यकारिणीवर प्रशालेतील गणित शिक्षक महेश खंडाळकर यांची निवड झाल्याबद्दल संस्था व प्रशालेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आले. प्रशालेत गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन व गणित रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते. या वेळी कु. गायत्री भैरप्पा, मेहरून शेख, ज्योती जाधव, ऐश्वर्या घोरपडे, अंकिता बनसोडे, संध्याराणी कांबळे, गायत्री स्वामी, सौंदर्य येडगे या विद्यार्थ्यांनी गणित शैक्षणिक साहित्य प्रदर्शित केले. तसेच गोपाळ गेडाम सर यांनी श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनाबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक सांस्कृतिक विभाग प्रमुख गोपाळ गेडाम सर यांनी केले. या कार्यक्रमासाठी श्री परमहंस शिक्षण संस्थेचे संचालक शंकर हुळमजगे, आनंदराज बिराजदार, शिक्षक सौरभ उटगे, व्यंकट बिराजदार, चंद्रकांत बिराजदार, अविनाश दुनगे, प्रवीण स्वामी, प्रा सुरेश जाधव, प्रा महादेव बिराजदार, गणेश जोजन, अप्पू मुदकण्णा, गोविंद मेडेबणे, पार्वती जगताप, कोमल कीर्तने, सुप्रिया झिंगाडे, आम्रपाली गायकवाड, शिवकन्या पांचाळ, व सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.