कळंब (प्रतिनिधी)-  दि 12 ते 15 डिसेंबर 2024 दरम्यान डेहराडून (हिमाचल प्रदेश) येथे वर्ल्ड आयुर्वेद काँग्रेस संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संमेलनात डॉ. संयोगिता लोंढे (एम डी क्रिया शरीर) यांनी पेपर प्रझंटेशन केले. कळंब शहरातील एका आयुर्वेद तज्ञाला आंतरराष्ट्रीय आयुर्वेद मंचावर पेपर प्रझंटेशन करण्याची संधी प्राप्त होते हीच मोठी उपलब्धी मानली जाते. 

संपूर्ण देशातील व जगातील शिबीरार्थी उपस्थित आहेत. यावेळी निरनिराळ्या विषयांवर व्याख्याने, चर्चा सत्रे, पेपर्स प्रझंटेशन, परिसंवाद, आयोजित करण्यात आली आहेत. डॉ संयोगिता लोंढे या क्रिया शरीर विषयाच्या प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत. येथील डॉ अभिजित लोंढे हे त्यांचे बंधू असुन डॉ रामकृष्ण लोंढे हे त्यांचे वडील आहेत. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्थरातुन त्यांचे अभिनंदन होत आहे.

 
Top