धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र कोळी समाज संघ व शामल कोळी वधू-वर सूचक सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी, 25 डिसेंबर रोजी शहरातील जनाई मंगल कार्यालयात कोळी महादेव समाजाचा वधू-वर सूचक मेळावा व अनुसुचित जमातीचे जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र मिळविण्याकरीता कायदेविषयक मार्गदर्शन पार पडले. या दोन्ही कार्यक्रमांना समाजबांधवांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सोलापूर शहराध्यक्ष गणेश कोळी, राज्य पोलीस प्राधिकरणचे अध्यक्ष उमाकांत मिटकर, प्रमुख पाहुणे महाराष्ट्र कोळी समाज संघाचे सचिव मदन भोई, वधू-वर सूचक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नागनाथ नाटकरे, प्रमुख मार्गदर्शक ॲड. प्रताप जाधवर, माजी सभापती तथा नगरसेवक सिद्धेश्वर कोळी, चंद्रकांत हुग्गे, जिल्हा परिषद माजी सदस्य उषा सर्जे, माजी नगरसेवक पंढरीनाथ कोणे, बालाजी कोरे, सुजित राऊत, राम चामे,  रमाकांत नाटकरे, चंद्रहास नलमले, माधव पटले,  राम काळगे, वैजीनाथ नाटकरे उपस्थित होते.

कार्यक्रमास पोलीस तक्रार प्राधिकरणचे अध्यक्ष उमाकांत मिटकरी यांनी यावेळी समाजाच्या प्रश्नांसाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावू, असा शब्द दिला आहे. यावेळी प्रताप जाधवर यांनी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी कायदेशीर मार्गदर्शन केले. कार्यक्रमात काही समाजबांधवांनी अडचणी मांडल्या. त्यावरजाधवर यांनी कायदेशीर सहकार्य करण्याचे अभिवचन दिले. मेळाव्यास लातूर, नांदेड यवतमाळ, वाशीम, परभणी, हिंगोली, पुणे, सोलापूर, बीड, धाराशिव, छत्रपती संभाजी नगर, सांगली, कोल्हापूर, जालना, जिल्ह्यातील समाज बांधव उपस्थित होते. उपस्थितांचे आभार बापू जगदे, श्रीधर बलवंडे यांनी व्यक्त केले.


 
Top