धाराशिव (प्रतिनिधी)- लातूर- बार्शी मार्गे मुंबई पुणे करीता जाणाऱ्या प्रवाशी करीता सध्या लातूर- मुंबई सुपर फास्ट ही (22107 व 22108) आठवडयातून तीन वेळा उपलब्ध असणारी गाडी आहे. लातूर धाराशिव बार्शीसह परीसरातील नागरीकांचे तसेच प्रवाश्यांचे मोठे हाल होत असल्याने लातूर-मुंबई नविन इंन्टरसिटी सुरु करणेबाबत विभागीय रेल्वे मंडळाच्या बैठकीत वारंवार सदर इंन्टरसिटी सुरु करणेबाबत मागणी केली होती. परंतू अधिकाऱ्यांकडून या संदर्भात कोणताही प्रतीसाद न मिळाल्याने व परीसरातील प्रवाश्यांचे, नागरीकांचे रेल्वेने प्रवास करताना होणारे हाल लक्षात घेवून आज लोकसभेच्या अधिवेशना दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे परीसरातील नागरीकांकरीता नविन लातूर मुंबई इंटरसिटी सुरु करणेबाबत मागणी केली.