धाराशिव (प्रतिनिधी)- त्रिलोक्याचे स्वामी भगवान श्री दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त धाराशिव येथे आयोजित गुरूचरित्र पारायण, भजन, कीर्तन, श्री दत्तनाम सप्ताह सोहळ्यात बुधवारी दि. 11 डिसेंबर रोजी तानसम्राट अजित कडकडे यांचा भजनसंध्या कार्यक्रम होणार आहे. पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठानच्यावतीने प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील श्री दत्तगुरू निवास, शांतीनिकेतन कॉलनी, धाराशिव येथे श्री दत्तगुरूंच्या जन्मोत्सवानिमित्त सप्ताह सोहळा घेण्यात येत असून, सप्ताह सोहळ्याचे हे 10 वे वर्ष आहे. या सप्ताह सोहळ्यात बुधवारी सायं 6.30 वाजता तानसम्राट कडकडे यांचा भजनसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. भाविकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठान तर्फे धनंजय रणदिवे यांनी केले आहे.