परंडा (प्रतिनिधी) - येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयात महिला लैंगिक छळ व तक्रार निवारण समितीची बैठक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली.
या बैठकीसाठी प्राचार्य डॉ सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने, माजी प्राचार्या डॉ दीपा सावळे, परंडा शहरातील सामाजिक कार्यकर्त्या सौ राखीताई देशमुख , महिला लैंगिक छळ व तक्रार निवारण समितीचे चेअरमन डॉ शहाजी चंदनशिवे, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे या समितीमधील सदस्य प्रा सौ कीर्ती नलवडे , सौ माने प्रतिभा,श्रीमती पल्लवी देशमुख, सौ खारे आदी उपस्थित होतेफ शैक्षणिक वर्ष 2024 25 या वर्षातील विविध समितीच्या कार्यक्रमा संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली महाविद्यालयामध्ये महिला कर्मचारी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भात विविध विषयावर सर्वानुमते ठराव संमत करण्यात आले. महाविद्यालयामध्ये महिला कर्मचारी व विद्यार्थिनी यांच्यासाठी तक्रार पेटी ची सोय करण्याचे ठरले महिला कर्मचारी व विद्यार्थिनी यांना विविध नियम व कायद्याची माहिती व्हावी म्हणून व्यापक असा कार्यक्रम आयोजित करण्याचे ठरले.
या कार्यक्रमासाठी तज्ञ वकील व पोलीस प्रशासन मधील अधिकारी यांना आमंत्रित करण्याचे ठरले.यावेळी माजी प्राचार्य डॉ दीपा सावळे यांनी मार्गदर्शन केले. तसेच सौ राखी देशमुख यांनीही या समितीच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे यासाठी काही महत्वपूर्ण सूचना दिल्या. अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी सांगितले की महाविद्यालयात व महाविद्यालयाच्या परिसरात आणि बाहेर 100 फुटावर संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेरे लावले असल्याने व त्याची कल्पना सर्व विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना दिलेल्या असल्याने कोणताही अनुचित प्रकार अद्याप घडलेला नाही व घडणार नाही यासंदर्भात जानेवारी महिन्यामध्ये तीन तारखेला महिला कर्मचारी व विद्यार्थीनी साठी महिला लैंगिक छळ व तक्रार निवारण समितीचा व्यापक असा कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे.अशी माहिती दिली.या बैठकीचे आयोजन प्रास्ताविक व सूत्रसंचालन या समितीचे चेअरमन डॉ शहाजी चंदनशिवे यांनी केले. तर प्राध्यापिका सौ कीर्ती नलवडे यांनी आभार मानले.