तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये ख्रिसमस, नाताळ सुट्टयांमुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे गर्दीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याकरीता त्यांचे दर्शन सुलभरित्या व्हावे म्हणून दिनांक 24 डिसेंबर 2024 वार मंगळवार ते 01 जानेवारी 2025 रोजी बुधवार पर्यंत पहाटे 1 वाजता चरणतिर्थ होऊन मंदीर दर्शनार्थ खुले केले जाणार आहे. सकाळची पुजेची घाट पहाटे 6 वाजता होऊन अभिषेक आरंभ होतील. याची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी असे आवाहन माया माने तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांनी कळवले आहे.