बुथनिहाय यादीमुळे 'कौन कितने गाव में' झाले सिध्द




तुळजापूर - विधानसभा मतदार संघाची मतमोजणी होवुन त्याची बुथनिहाय यादी प्रसिध्द झाल्यांनतर कौन कितने गाव मे हे स्पष्ट झाल्याने अनेकांची मोठी गोची झाली आहे.

मतदान घेण्यासाठी उमेदवारांनी  गावातील पुढाऱ्यांसह विविध समाजाच्या ठेकेदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. त्यामुळे 'भाऊ, काही काळजी करू नका, संपूर्ण  व 

तुमच्याच' असा उमेदवाराला विश्वास त्यांनी दिला होता. आता प्रशासनाकडून बुथनिहाय याद्या जाहीर झाल्यानंतर विजयी उमेदवारांपेक्षा पराभूत उमेदवारांनी या बुथनिहाय याद्यांचे अवलोकन सुरू केल्याने वास्तविक किती मतदान झाले हे उघड होत आहे. यामुळे अनेक गावपुढारी व समाजाच्या ठेकेदारांची गोची झाली असून ते आता चांगले तोंडघशी पडले आहेत. तसेच अनेक गावांमध्ये कटुताही निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक पक्षातील प्रमुख पदाधिका-यांच्या गावात त्यांचाच पक्षाच्या उमेदवारांना कमी मते पडल्याने असे पदाधिकारी या यादीने पार उघडे पडले आहे ज्याला गावात किमत नाही त्याला मोठे पदे कशाला? सवाल असा सवाल त्यांचाच पक्षाचे पदाधिकारी कार्यकते करु लागले आहेत. 


सध्या सामाजिक माध्यमातून 'संपली निवडणूक, करा नात्यांची जपवणूक' असे संदेश व्हायरल होत निवडणुकीच्या धुरळ्यात दिवस-रात्र परिश्रम घेतल्यानंतर अनेक गावपुढाऱ्यांनी हा घालविण्यासाठी भ्रमंतीचे प्लॅन केले असून, काहींनी तीर्थक्षेत्राला भेटी देण्याचे नियोजन केले आहे. याबाबत गावागावांत गमती जमती ऐकायला येत आहेत. काहींच्या मते पराभूत उमेदवाराला तोंड कसे दाखवावे, या विचाराने ते बाहेरगावी गेले आहेत तर काही आपले पितळ उघडे झाल्याने उमेदवाराचा राग शांत होईपर्यंत दूर गेलेले बरे अशा वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळत आहेत. तसेच काहींच्या मते, निवडणूक आयोगाने बुधनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर करू नये. तर काही पराभूत झालेल्या सज्जन उमेदवारांनी जे झाले ते विसरून कुणालाही दोष न देता आत्मचिंतन करीत आहेत.


शक्यता असले तरी बुथनिहाय मतदान बाहेर येण्याच्या सुविधेमुळे पराभूत उमेदवार काही गावे आणि वस्त्यांवर वचपा काढण्याची असल्याने निवडणूक आयोगाने दिलेली ही सुविधा ग्रामीण भागात वादाचे कारण ठरण्याची भीतीही व्यक्त होत आहे. निवडणूक प्रचाराच्या काळात अनेक गावे आणि वस्त्यांमध्ये अमुक कामे करून द्या किंवा एखाद्या कामासाठी अमुक निधी आताच द्या, सगळे मतदार तुमच्या पाठीशी उभे राहतील, असे आश्वासन दिले. तसेच आमचा समाज खूप मोठा असून, गठ्ठा मते असल्याने समाजासाठी काही तरी द्या, असे म्हणत समाजाच्या ठेकेदारांनीही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. या गावपुढारी व समाजाच्या ठेकेदारांनी एकापेक्षा जास्त उमेदवारांकडून लाभ पदरात पाडून घेतल्याची उदाहरणे आहेत. 


अनेक गाव पुढाऱ्यांनी प्रचाराच्या काळात फुशारक्या मारून स्वतःचा फायदा करून घेतला आता मतमोजणीनंतर त्या गावातील मतदान केंद्रावरील मतदानाची आकडेवारी पुढे आल्याने ज्यांनी मतांचे कंत्राट घेतले होते, अशा अनेकांचे  पितळ उघडे पडले आहे. 

 
Top