उमरगा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील केसरजवळगा येथील गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.9) शाळेत रक्तवाढीच्या गोळ्या खाल्याने 30 विध्यार्थ्यांना उलट्या,मळमळ चक्कर येणे डोके दुःखी वाढली असल्याने त्यांना मुरूम येथिल शासकीय रुग्णालय दाखल करण्यात आले.
तालुक्यातील केसरजवळगा येथील आरोग्य उपकेंद्राच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. (आयर्न फॉलिक ऍसिड असे गोळ्यांचे नाव आहे) सदरील औषधामुळे 30 विद्यार्थ्यांना उलट्या,मळमळ होत असल्याने त्यांना मुरूम येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. प्रारंभी शाळेचे मुख्याध्यापक डी. एस. कुलकर्णी यांनी 16 मुली आणि तीन मुले यांना दवाखान्यात पाठवले. नंतर पुन्हा अनेक विद्यार्थी चक्कर येत आहे. मळमळ होत आहे. म्हणताना पुन्हा दहा ते अकरा विद्यार्थ्यांना दवाखान्यात पाठवले होते.
यातील नववी, आठवी वर्गात शिकणाऱ्या पाच मुली आणि एका मुलाला सलाईनच्या माध्यमातून औषध उपचार करण्यात आले. सरकारी दवाखान्यातुन विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या गोळ्या देण्यात आल्या होत्या. सदर विद्यार्थ्यांची प्रकृती चांगली असल्याची माहिती मुरूम ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधीक्षक डॉ.महेश अरधले स्वामी यांनी दिली. या घटनेमुळे पालकवर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरात खळबळ उडाली आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा मिळत नाहीत अशी ओरड जनतेतून केली जाते. चक्क आरोग्य विभागाच्यावतीने दिलेल्या गोळ्यामुळे विद्यार्थ्यांना मळमळ होणे, उलट्या येणे असे प्रकार घडल्याने शालेय विद्यार्थ्यांना मुरूम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सदरील माहिती मिळताच उमरगा-लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुरूम ग्रामीण रुग्णालयात धाव घेऊन विद्यार्थ्यांच्या प्रकृतीबाबत चौकशी केली. पाच मुली आणि एका मुलाला सलाईन लावून घरी पाठवण्यात आले आहे. सोनाली पवार (9 वी), प्रार्थना पवार (9 वी), मुस्कान हाजीवाले (9वी), अलिया पटेल (8वी), सकीला लकडे (8वी), मुसाली शेख (8वी) हा मुलगा आहे.
केसर जवळगा शाळेतील विद्यार्थ्यांना गोळ्या घेतल्यानंतर मळमळ होण्याचे प्रकार झाले चार विद्यार्थ्यांना डॉक्टरांनी उपचार केले असून उर्वरीत सर्व विद्यार्थी ठणठणीत आहेत.
शिवकुमार बिराजदार
गटशिक्षणाधिकारी उमरगा
या बाबतीत अधिक माहिती घेण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी उमाकांत बिराजदार यांच्या भ्रमणध्वनी वरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यानीं फोन रिसिव्ह केला नसल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.
सकाळी शाळेतील विद्यार्थ्यांना आरोग्य उपकेंद्राच्या कर्मचाऱ्यांनी दिलेले गोळ्या औषधे विद्यार्थ्यांना देण्यात आल्यानंतर कांही मुले व मुली चक्कर येत आहे मळमळ करीत आहे म्हणाल्याने त्यांना तात्काळ दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.
डी.एस.कुलकर्णी
मुख्याध्यापक गांधी विद्यालय
केसर जवळगा ता उमरगा.