तुळजापूर (प्रतिनिधी) - पंतप्रधान पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य सरकारने सन 2023 मध्ये घेतला. विविध नैसर्गिक आपत्तींमुळे पिकांच्या होणाऱ्या नुकसानापासून शेतक-यांना आर्थिक संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना राबविण्यात येत आहे. यंदाच्या रब्बी हंगामासाठी सुद्धा ही योजना राबविण्यात येत असून गेल्या 16 डिसेंबर अखेर 3 लाख 18 हजार 204 शेतक-यांनी  रब्बी हंगामासाठी जिल्हयातील  शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा काढल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यात राज्याने 739554144 व केंद्राने 465160224 अशी एकुण 1,20,50,32,572 भरुन जिल्ह्यातील 3 लाख 18 हजार 204 शेतकऱ्यांना 10,65,27,19,202 ऐवड्या रकमेचे विमा कवच मिळवुन दिले आहे. परतीचा पाऊस, अवकाळी पाऊस, गारपिट यामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नैसर्गिक आपत्ती, कीड व रोगांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पीकविमा योजनेअंतर्गत मदत मिळू शकते. आतापर्यंत तुळजापूर  तालुक्यात रब्बी हंगामातील 100 टक्के पेरणी आटोपली असून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने अवकाळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही.  यंदाच्या रब्बी हंगामातील पिकांचा पीक विमा काढण्याकरिता 15 डिसेंबर ही अंतिम मुदत ठरविण्यात आली  होती.

 
Top