तुळजापूर (प्रतिनिधी)- येथील समर्थ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रतीवर्षा प्रमाणे या वर्षीही दिनदर्शिकेचे वाटप संस्थेच्या सभासद,खातेदार, ठेवीदार यांना करण्यात येणार असून यावर्षीच्या 2025 दिनदर्शिकेचे प्रकाशन नुकतेच संस्थेच्या कार्यालयात डी. बी. मोरे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व प्रसाद कुलकर्णी सहकार अधिकारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन नारायण नन्नवरे, व्हा, चेअरमन श्रीकांत भोजने, सचिव सज्जन जाधव, संचालक संजय व्हटकर, राजेंद्र माळी, सुरेखा देशमाने, अनुराधा गायकवाड, संतोष इंगळे यांच्यासह सभासद कर्मचारी उपस्थित होते.