तुळजापूर (प्रतिनिधी)- महायुतीने मताचा धंदा केला. ही संस्कृती महाराष्ट्राची नसल्याने जिल्हयात चारही जागी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडुन येवुन महाविकास आघाडीचा विजय दणदणीत होवुन सत्ता ही महाविकास आघाडीचीच येणार असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी काँग्रेस उमेदवार धिरज पाटील यांच्या प्रचाराच्या उदघाटन प्रसंगी केले.
यावेळी व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, उमेदवार ॲड. धिरज पाटील, सक्षणा सलगर, संजय पाटील दुधगावकर, शामल वडणे, ज्योती सपाटे, रामचंद्र आलुरे, धैर्यशील पाटील, जगन्नाथ गवळी आदी सह महाविकास आघाडी पदाधिकारी उपस्थितीत होते.
प्रचार शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ नेते माजी मंत्री आमदार अमीत देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, तुळजापूरला येत असताना मला नेहमी आमच्या कुळाकडे येतोय याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. धाराशिवच्या पाटलांचे व लातुरच्या देशमुखाचा संघर्ष, वाद, चढाओढ सर्व महाराष्ट्रने पाहिला आहे. मराठवाड्याचे हक्काचे 21 टीएमसी पाणी लातूर जिल्ह्याला मिळणार नाही. याची जाणीव असुनही स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी कुठलाही भेदभाव न करता मंजुरी दिली. माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांचा ही 21 टिएमसी पाणी मिळवण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. मधुकरराव चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते आहेत. महाविकास आघाडीत त्याचां योग्य तो सन्मान केला जाईल. राणाजगजितसिंह पाटील व त्यांच्या वडीलांना शरदचंद्र पवार यांनी सगळे कांही देऊनही तुम्ही त्यानां सोडून दिले. मग तुम्ही कोणाचे आहात. महाविकास सरकार आल्यावर या धाराशिव जिल्ह्यात उद्योग उभारू, सिंचन, दळणवळण सुधारू, सुशिक्षित बेरोजगारानां काम देऊन त्यांची आर्थिक उन्नती करणार. या महायुती सरकारने तुमच्या मताचा धंधा केला आहे. कालच मुंबई मध्ये राहुल गांधी यांनी पंचसूत्री जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये महायुती सरकारपेक्षाही जास्त सेवा सुविधा देण्याचे वचन दिले आहे. राज्य सरकारनेही एक कायदा करून शेतकऱ्यांच्यां मालाला एमएसपी सारखाच योग्य सरकारी धान्यभाव जाहीर करायचा कायदा करावा लागेल. हे बोलत असतानां महाविकास आघाडीचे उमेदवार अँड. कुलदिप उर्फ धिरज पाटलानां प्रचंड मतानी विजयी करा असे आवाहन केले.
खासदार ओमराजे निंबाळकर आपल्या धडाकेबाज भाषणात म्हणाले की, सहा महीन्यापुर्वीच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत संविधानाची शक्ती आपणाला दिसली आहे. लातुर जिल्ह्याची प्रगती पहाता नवीन लोकांना लातूर जिल्ह्यातीलच धाराशिव तालुका आहे असे वाटते. ओमराजे निंबाळकर खासदार असताना तुळजापूर रेल्वेच्या कामाचे उद्घाटन झाले. पण त्याचे श्रेय विरोधक घेत आहे. तुमच्या जन्म गावात ओमराजेला 428 मताची आघाडी मिळाली आहे. म्हणून आदी आपल गाव बघा मग जिल्ह्याच, तालुक्याच नेतृत्व करा. तेर येथे गोरोबा काकांच्या मंदिराचे बांधकाम करतेवेळी साडेपाच एक्कर असणाऱ्या हनुमंत श्रीपती ऐडके या गरीब शेतकऱ्यांची जमीन घेण्यासाठी आमदारकीने आदेश काढता व तेथेच तुमची दीडशे ऐक्कर जमीन असुनही हातही लावत नाही. बळजबरीने सामान्य शेतकऱ्यांचे भुसंपादन करता. फक्त सोशल मिडीयावर एक हजार कोटी खर्च केल्यावर श्री तुळजाभवानी मंदिर कस दिसेल हे दाखवायचे कामं करता. श्रेय घेण्यासाठी उद्घाटनांचे नाटकं करता म्हणून विरोधकाच्या भूलथापांना बळी न पडता मी स्वतः ओमराजे निंबाळकर निवडणूक लढवत आहे असे समजू अँड. कुलदिप उर्फ धिरज पाटलानां प्रचंड मतानी निवडून आणावेच लागेल असे आवाहन उपस्थित जनतेला केले.
प्रास्ताविक पर भाषणात महाविकास आघाडीचे उमेदवार अँड. कुलदिप उर्फ धिरज आप्पासाहेब पाटील म्हणाले की, माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांला उमेदवारी दिली आहे. ऐक निष्ठावान कार्यकत्याला संधी मिळाली आहे. मी माजीमंत्री मधुकरराव चव्हाण, जीवनराव गोरे, अशोक जगदाळे या सर्वांचे मनापासून धन्यवाद मानतो.
या प्रचारकार्याच्या शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संजय पाटील दुधगावकर, सक्षणा सलगर,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे कमलाकर चव्हाण,प्रतीक रोचकरी,अनील लबडे,रूबाब पठाण, मेहेबुब पटेल,जगन्नाथ गवळी,सुधीर मगर आदी पदाधिका-यानी आपली मनोगते व्यक्त केली.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अग्नीवेश शिंदे व जुबेर शेख यांनी केले.तर आभार युवा नेते अमोलभैय्या कुतवळ यांनी मानले.या वेळी शामलताई वडणे,स्मिता शहापुरकर, शैलाताई उंबरे,ज्योतीताई सपाटे,सुधीर कदम,प्रकाश चव्हाण, राजाभाऊ शेरखाने, मधुकर शेळके,विनोद वीर,शहाबाझ काझी उपस्थित होते.