धाराशिव (प्रतिनिधी)-धाराशिव शहरातील जुनी गल्लीतील रहिवाशी सुशीला शिवाजीराव केसकर (वय 68) यांचे अल्पशा आजाराने गुरूवार, 7 नोव्हेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर गुरूवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, असा परिवार आहे. जेष्ठ पत्रकार रवींद्र केसकर यांच्या त्या मातोश्री होत.