धाराशिव (प्रतिनिधी)- विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी त्यांची गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्यास त्यांच्यावर कोणते गुन्हे दाखल आहेत. याबाबतची सविस्तर माहिती माध्यमामध्ये निवडणूक उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते मतदान होईपर्यंत जाहीर करणे अनिवार्य केले आहे. अशा पार्श्वभुमीच्या उमेदवारांनी मतदारांना माहिती होईल अशा प्रकारे जाहिरात द्यावी, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे.
गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांनी प्रचाराच्या काळात तीन वेळा वृत्तपत्रांतून आणि दूर चित्रवाणी वाहिन्यांवरून गुन्हेगारी पार्श्वभूमी संदर्भातील माहिती प्रकाशित करणे आवश्यक आहे. गुन्हेगारी पार्श्वभुमी असलेले उमेदवार उभे करणाऱ्या राजकीय पक्षाने सुध्दा गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे आवश्यक आहे.
प्रसिध्दीचा कालावधी
नामांकन मागे घेतल्यानंतर पहिल्या 4 दिवसात - 5 ते 8 नोव्हेंबर 2024. त्यानंतर पुढील 5 ते 8 दिवसांच्या दरम्यान- 9 ते 12 नोव्हेंबर 2024. 9 व्या दिवसापासून प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत - 18 नोव्हेंबर 2024