धाराशिव (प्रतिनिधी) - नगर परिषदेतील बहुतांश कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपुर्ती देयकाचा लाभ देण्यासह इतर विविध मागण्या तात्काळ मान्य कराव्यात. अन्यथा दि.9 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत, संवर्ग कर्मचारी संघटनेच्यावतीने एका निवेदनाद्वारे दि.29 नोव्हेंबर रोजी दिला आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषदेतील बहुतांश कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपुर्ती देयकाचा लाभ देण्यात यावा यासाठी नगर परिषदेने ठराव पारित केला होता. मात्र त्याबाबत कोणतीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे संदर्भीय पत्र नगर परिषदेस मिळाल्यानंतर देखील कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. तर नगर परिषदेतील कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना नगर परिषद सर्वसाधारण सभेने ठराव क्र.45 दि.27/2/2009 अन्वये ठराव पारित केलेला असून त्या ठरावाच्या अनुषंगाने नगर परिषदेतील बहुतांश कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपुर्ती देयकाचा लाभ दिला असून सदरील ठरावाचे अनुषंगाने वैद्यकीय प्रतिपुर्तीचा लाभ अनुज्ञेय असताना देखील नगर परिषदेकडून संबंधीत कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपुर्तीचा लाभ दिला

जात नसल्यामुळे त्या देयकाचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा. तर नगर परिषदेतील नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना पेंशन विक्रीचा लाभ अनुज्ञेय करण्यात यावा. तसेच सन 2023 पासून या कार्यालयास अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनापोटी शासनाकडून प्राप्त झालेल्या

सहायक अनुदानातून करण्यात आलेल्या खर्चाची माहिती संघटनेस लेखी कळवून देखील अद्यापपर्यंत देण्यात आलेली नाही. सदर अनुदानामधून संबंधित लेखापाल व संबंधित हे अनुदानातील रक्कमेचा इतरत्र वापर करुन शासनास खोटे उपयोगिता प्रमाणपत्र सादर करुन शासनाची दिशाभूल करत आहेत. त्याची चौकशी करुन त्यानुषंगाने कार्यवाही प्रस्तावित करण्यात यावी. तसेच कार्यरत असलेल्या राज्यस्तरीय संवर्गीय अधिकाऱ्यांच्या अंशदानाच्या रक्कमा ( ) सहायक अनुदानातुन भरणा करण्यात येऊ नये. तर सन 2005 नंतर नगर परिषदेच्या आस्थापनेवर सेवेत नियुक्त झालेल्या गट- क व गट- ड मधील कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची विकल्प घेऊन तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा पहिला लाभ व दुसरा लाभ दिलेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीतील फरकाची रक्कम अदा करण्यात यावी. तर नगर परिषदेतील कार्यरत व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन निश्चितीतील फरकाच्या रक्कमेचा 5 वा हप्ता तात्काळ अदा करण्यात यावा. तसेच नगर परिषद ही अ वर्ग नगर परिषद या नगर परिषदेस 2023 पासून शासनाकडून वाढीव सहायक अनुदान प्राप्त होत असताना देखील नगर परिषदेकडून देखील 2016 पासून उपदान व

अवलोकनार्थ सविनय खार असून या आस्थापना विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांना लाभ अनुज्ञेय केले जात नाहीत. तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे

रजारोखीकरणाच्या रक्कमा दिल्या जात नाहीत. त्यामुळे नगर परिषदेच्या आस्थापनेवरील कार्यरत असलेल्या गट- क व गट- ड च्या कर्मचाऱ्यांवर होत असलेला अन्याय दूर करावा. अन्यथा दि.9 डिसेंबरपासून काम बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे. यावर संघटनेचे अध्यक्ष विनायक बिसले, जिल्हाध्यक्ष दीपक तावडे, सचिव रावसाहेब शिंगाडे, रियाज सय्यद, अजिंक्य जानराव, लहू गेजगे, अशोक मोहिते, सलीम शेख, विनोद रोकडे, चंद्रकला कोठाळे, बेबी शितोळे, अंबिका तोडकरी, संगीता थोरे, हिराबाई वाला, संगीता वाला, चांदुबाई काळे, मंगल निकम, सुशीला शिंदे, मंगल गायकवाड, अंबु नाईकवाडी, मधुकर शिंगाडे, भागाबाई वाघमारे, प्रदीप मोटे, विकास माने, सचिन गायकवाड, यु.आर. राऊळ, एस.एस. साळुंके, एस. जी. शेखर, डी.एम. बनसोडे, बी.डी. वाघचौरे, आर. आर. कोरवी, रसूल शेख, संतोष गायकवाड, सुदाम खरात, एस.एल. उंबरे, एस.बी. बागवान, एस.आर. कुलकर्णी, आर.यु. सुतार, तानाजी सुरवसे, फारुख शेख, एस.एस. धावारे, गजानन धुमाळ, एस.आर. अवधूते, विलास कठारे, श्याम गायकवाड, राजाराम पवार, भगवान उंबरे, सतीश पेठे, अरुण साठे, मनोहर नाईकवाडे, सिद्राम जानराव, भास्कर वाघचौरे, चाँद शेख आदींसह इतरांच्या सह्या आहेत.

 
Top