सोलापुर (प्रतिनिधी)-भारत सरकार, गृह मंत्रालय, राजभाषा विभागाच्या धोरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल सोलापूर मंडल रेल प्रबंधक कार्यालयाला यंदाच्या वर्षी (2023-24) केंद्र सरकारच्या कार्यालये/उपक्रमाच्या श्रेणीत प्रथम पुरस्कार‘राजभाषा शिल्ड' आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
नगर राजभाषा कार्यान्वयन समिती, सोलापूर यांच्या वतीने दिनांक 27 नोव्हेंबर, 2024 रोजी आयोजित सहामाही बैठकीत हा सन्मान प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापूर विभागाचे मंडल रेल प्रबंधक श्री नीरज कुमार दोहरे, अध्यक्ष,नराकास आणि बँक ऑफ महाराष्ट्रचे सहायक महाप्रबंधक संजीव कुमार, सहायक निदेशक, राजभाषा विभाग, गृह मंत्रालय, भारत सरकार राजेंद्र प्रसाद वर्मा आणि मुख्य महाप्रबंधक (परियोजना प्रमुख), एनटीपीसी लि., सोलापूर तपन कुमार बंदोपाध्याय व वरिष्ठ मंडल कार्मिक अधिकारी ए.पी. भगत यांचा समावेश होता.
सोलापूर मंडल रेल प्रबंधक कार्यालयाच्या या सन्मानाबद्दल कार्यालयाच्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. राजभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल प्रेरणादायी ठरले आहे.