धाराशिव (प्रतिनिधी) - आजाद समाज पार्टी (काशीराम) चे उमेदवार  भैय्यासाहेब नागटिळे यांच्या प्रचारार्थ पार्टीचे संस्थापक खासदार चंद्रशेखर आझाद रावण हे आज दि. १५ नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथे येणार आहेत.

तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आजाद समाज पार्टी (काशीराम) चे उमेदवार भैय्यासाहेब नागटिळे यांच्या प्रचारार्थ पार्टीचे संस्थापक तथा खासदार चंद्रशेखर आझाद रावण हे तुळजापूर येथे येणार आहेत. ही सभा दुपारी एक वाजता श्रीनाथ मंगल कार्यालय नळदुर्ग रोड ,तुळजापूर येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेस जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन उमेदवार भैय्यासाहेब नागटिळे यांनी केले आहे.

 
Top