कळंब (प्रतिनिधी)- जे केलंय ते तुमच्या समोर प्रत्येक गावात केलेल्या कामाची मी यादी दाखवतो, फक्त अडीच वर्ष मला सत्तेचा काळ मिळाला मात्र गद्दारी सहभागी झालो नाही म्हणून त्यानी माझ्यावर राग काढला. राग माझ्यावर असला तरी नुकसान जनतेच केलं आहे अश्या स्वार्थी लोकांना उत्तर देण्याची संधी सोडू नका असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केले. 

भोगजी (ता. कळंब ) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी आमदार पाटील म्हणाले की, या मतदार संघातील जनता कायम स्वाभिमानी वृत्ती ठेवून न्याय पदरात टाकते. आताही तुमच्या न्यायाची मला व महाविकास आघाडीला आवश्यकता आहे. तुमच्या हितासाठी मी पूर्ण क्षमतेने काम केलेलं आपल्या सर्वांच्या समोर आहे. सत्तेच्या काळात जेवढ या मतदार संघात सत्ता काळात कधीही नव्हे एवढा निधी खेचून आणला आहे. जे केलंय तेच मी सांगतो हा माझा स्वभाव आहे, मी आमदार झालो म्हणून तुमच्यात आणि माझ्यात कधीही अंतर पडू दिलेलं हे मी विश्वासाने सांगू शकतो असा दावा आमदार पाटील यांनी सांगितले.

गद्दारी करून सरकार पाडले भाजपने फक्त पक्ष फोडले नाहीत तर महाविकास आघाडीकडून घेतलेल्या निर्णय स्थगित केले. जनतेच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विकास कामाना स्थगिती दिली. त्यातही मी गद्दारीत सहभागी झालो नाही म्हणून आपल्या मतदार संघात घेतलेली स्थगिती कायम ठेवली, शेवटी संघर्ष करण्याची भूमिका घेतल्यानं आपण न्यायालयात जाऊन ही स्थगिती उठवली. पण हे सरकारने न्यायालयाचा आदेश देखील सरकारने पाळला नाही. यानी मला शिक्षा देण्यासाठी हा सगळा प्रकार केला पण यामुळे अन्याय येथील सामान्य जनतेवर झालेला. आता जनतेच्या दरबारात ते आलेत. त्यांना विकासासाठी मत द्या असं म्हणू लागले आहेत. ज्या लोकांनी विकासकामाना स्थगिती दिली ते काम होऊ दिली नाहीत त्यांनी विकासासाठी मत मागावे का हा माझा त्यांना थेट सवाल आहे. तर जनतेनी अश्या दूटप्पी लोकांना त्यांची जागा दाखवून द्यावी अशी विनंती आमदार पाटील यांनी केली.

 
Top