धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील गवळी समाजाच्या वतीने दीपावली पाडव्या दिवशी शतकानू शतकापासून चालत आलेले पशु व बळीराजा पूजन परंपरेनुसार याही वर्षी गवळी समाजाच्यावतीने गवळी गल्लीतील मानाचा गणपती व धाराशिवचा महाराजा श्री च्या व्यासपीठावर, श्री गणेशाची व दुर्गामाताची पूजाविधी, आरती करून, समाजाच्या वतीने सगर पूजेचा कार्यक्रम अत्यंत आनंदी प्रसन्नतेच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
दीपावली पाडव्याच्या निमित्ताने गेली अनेक वर्षापासून गवळी समाज पशुपालक यांनी ढोल ताशा बँड पथक वाद्य वाजवून रेडा, म्हशी यांच्या आकर्षक सजवून, अंगावर विविध वेलबुटी, विविध आकर्षक केशरचनेतूून, मोरपंखाचे मूरकूजा, पायात पितळी तोडे, कवडीमाळ घालून सजवून सगर पूजेला, आपल्या परिवारासह येतात. पंचमहाभूतांची पूजा करून श्रीफल वाढवून, महिला कडून ओवाळून ,हळदी कुंकू लावून पशुना नैवेद्य खाण्यास दिला जातो. रेडा व म्हैस काशिनाथ दिवटे, भीमाशंकर दहीहंडे कारभारी मंडळींच्या समोर सलाम करावयास लावली जातात. त्यानंतर सलाम करून घेणाऱ्यां पशुपालकांना टिळा लावून, पान सुपारी देऊन त्यांचा सन्मान केला जात होता.
कार्यक्रम पार पाडण्यासाठी प्रा. गजानन गवळी, नंदकुमार हुच्चे, मनोज अंजीखाने, गिरीजाप्पा दहीहंडे, कुंदन दहीहंडे बंधू, राजकुमार दिवटे बंधू, राजू पंगुडवाले, राम, भरत, लक्ष्मण मिसाळ, विठ्ठल आपुने ,भालचंद्र हुच्चे,परिश्रम घेऊन फटाक्याच्या आतषबाजीत संपन्न झाला.