तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व पूर्तता करण्याचे आश्वासन दिले.                                  

आ. राणाजगजितसिंह पाटील व आपल्या माध्यमातून तीर्थक्षेत्र तेरच्या विकासासाठी भरपूर विकास निधी प्राप्त झाला आहे. संत गोरोबाकाका मंदिर, त्रिविक्रम मंदिर, पुराणवस्तू संग्रहालय यासह अनेक मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. तेरणा कालव्याचा प्रश्न देखील मार्गी लागला असून शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे. तीर्थक्षेत्र तेर ते आई तुळजाभवानीच्या तुळजापूरला जोडणाऱ्या रस्त्याचे काम देखील होत आहे.  

राज्यातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केलेला आहे. ही योजना बंद होणार नसून विरोधक मात्र याबाबत अपप्रचार करत आहेत. महिलांना एस.टी.बस मध्ये 50 टक्के तिकिट सवलत, 3 मोफत सिलेंडर, मुलींचे मोफत शिक्षण, लखपतीदीदी आदी योजना आणलेल्या आहेत. आ. .राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून जिल्ह्यात अनेक विकास कामे  प्रगतीपथावर आहेत.

महिलांचा सन्मान करणाऱ्या महायुती सरकारला पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी, आ. राणाजगजितसिंह पाटील यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी आपल्या सर्वांना प्रयत्न करायचे आहेत असे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी केले.यावेळी उषाताई येरकळ,लतिका पेठे, उपसरपंच श्रीमंत फंड,भास्कर माळी, गणेश फंड,प्रजोत रसाळ, नारायण साळुंके,संभाजी कांबळे, अमित कोळपे, अर्शाद मुलांनी, सोमनाथ माळी, अजित कदम , काकासाहेब मगर व महीला उपस्थित होत्या.


 
Top