धाराशिव - जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे सुमारे एक ते दीड महिन्याच्या दीर्घ प्रशिक्षणासाठी शुक्रवारी रवाना झाले आहेत. यामुळे त्यांनी आपला पदभार जिल्हा परिषदेचे सीइओ डॉ.मैनाक घोष यांच्याकडे सोपवला आहे. आता डॉ. घोष प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.
मागील दोन वर्षांपासून येथे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.सचिन ओम्बासे कार्यरत आहेत. आता त्यांना शासनाने एक ते दीड महिन्याच्या महसुली प्रशिक्षणासाठी दिल्ली येथे बोलावले आहे. यामुळे शुक्रवारी ते कार्यालयात कामकाज करुन रवाना झाले. सोमवारपासून त्यांचे प्रशिक्षण सुरु होऊ शकते. दरम्यान, जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी त्यांनी जिल्हा परिषदेचे सीइओ डॉ. घोष यांच्याकडे सुत्रे सोपवली आहेत. यापुढे प्रभारी जिल्हाधिकारी म्हणून घोष काम पाहणार आहेत.