तुळजापूर- येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभाग व राज्यशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी कनिष्ठ विभाग प्रमुख प्रा धनंजय लोंढे यांच्या हस्ते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ आबासाहेब गायकवाड यांनी संविधान उद्देशिकाचे सामुदायिक वाचन घेतले.सदर प्रसंगी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा व्ही.एच चव्हाण,प्रा वागदकर एस.पी यांच्या सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

याप्रसंगी कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यशास्त्र विभागाच्या वतीने तुतारी भित्तिपत्रिकेचे प्रकाशन देखील प्रा धनंजय लोंढे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा डॉ.मंत्री आर आडे यांनी केले तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जीवन पवार यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.

 
Top