तुळजापूर (प्रतिनिधी) - येथील श्री तुळजाभवानीच्या शारदिय नवरात्र महोत्सव 2024 मध्ये यात्रा अनुदानातून नगर परिषद अंतर्गत करण्यात आलेल्या कामाची स्थळपाहाणी चौकशी व सीसीटीव्ही  फुटेजची पहाणी करुन बील अदा करण्याची मागणी आम आदमी पक्षाने विभागीय आयुक्त व जिल्हाअधिकारी यांना निवेदन देवुन केली.

श्री क्षेत्र तुळजापूर येथे नुकताचा श्री तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव पार पडला. सदर उत्सवाकरीता शासनाकडुन नगर परिषद तुळजापूरला कोट्यावधी रुपयाचे यात्रा अनुदान निधी दिला जातो. या अनुदानाच्या माध्यमातुन शारदीय नवरात्र महोत्सव व त्यांनंतरच्या अश्विनी पौर्णिमा निमित्ताने पायी वारी करणाऱ्या भाविकांना तसेच शहरात दाखल होणाऱ्या भाविकांसाठी सोयीसुविधा पुरविण्याचे काम नगर परिषद तुळजापूर मार्फत केले जाते. परंतु सन 2024 च्या यात्रा कालावधीत अधिकारी व कर्मचारी तसेच ठेकेदार यांनी मिलीभगत करुन यात्रा कालावधीत भक्त दर्शनिय भागात थातुर मातुर कामे करुन यात्रा अनुदानात मोठ्या प्रमाणात अपहार केलेला असे समजते. तसेच शहरात मुरुम टाकणे, लाईट बसवणे, पाणी पुरवठा करणे ही कामे केवळ कगदोपत्री दाखवुन अनेक लाखो रुपयात अपहर केल्याची शक्यता आहे.

तरी तुळजापूर येथील शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये यात्रा अनुदानातून करण्यात आलेल्या कामाची तपासणी करुन, व जाय मोक्यावर पाहाणी करुन तसेच त्याचे फोटो प्रतीची पडताळणी करुन व सीसीटीव्ही  कॅमेरा फुटेज याची पाहाणी करुन त्यात जर संबंधित अधिकारी कर्मचारी व ठेकेदार दोषी आढळल्यास  यांच्यावर योग्यती कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच ठेकेदारास कोणतेही बील अदा करण्यात येवु नये ही विनंती.असे निवेदन आम आदमी पक्षाचे शहराध्यक्ष किरण माणिकराव यादव यांनी दिले आहे.

 
Top