तुळजापूर (प्रतिनिधी) - जिल्हयात 241 तुळजापूर विधानसभा मतदार संघात सर्वाधिक चुरशीने मतदान होवुन येथे जिल्हयात सर्वाधिक मतदान झाल्याने वोटीग मशीन सध्या तिहेरी बंदोबस्तात ठेवण्यात आल्या असुन सध्या निवडणुक कार्यालयात तगडा बंदोबस्त लावल्याने छावणी स्वरुप आल्याची माहीती निवडणूक निर्णय अधिकारी संजयकुमार डव्हळे यांनी दिली.
241 तुळजापूर विधानसभा मतदार संघाची मतदान प्रक्रिया पार पडल्या. वोटींग मशीन तुळजापूर येथील श्रीतुळजाभवानी अभियांत्रिकी महाविधालयाचा स्पोर्ट हाँल मध्ये बनविण्यात आलेल्या स्ट्राँग रुम मध्ये बुधवार दि. 20 नोव्हेंबर रोजी राञी आल्यानंतर ठेवण्यात आला. या वोटींग मशीन स्ट्राँग रुमला बाँर्डर सेक्युरीटी फोर्स, केंद्रीय पोलिस, राज्य पोलिस दलाचा तिहेही बंदुकधारी हत्यारी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यासाठी चार पोलिस अधिकारी, पंचाऐंशी पोलिस कर्मचारी वोटीग मशीनवर नजर ठेवण्यासाठी येथे बंदोबस्त करीत आहे
सदरील भाग सीसीटीव्हि या नजरेत असुन स्ट्राँग रुम बघता यावी यासाठी स्क्रिन लावला असुन तो चोवीस तास चालु ठेवला आहे. सदरील स्क्रीन जवळ उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी कधीही येवुन पाहुन जावु शकतो, मुक्काम करु शकतो.