धाराशिव (प्रतिनिधी)-  ॲड. अनिल काळे यांनी या कारखान्याची स्थापना फक्त नफा मिळवण्याच्या उद्देशाने नव्हे, तर शेतकऱ्यांच्या व्यथा दूर व्हाव्यात आणि त्यांना आपल्या भागात हक्काच्या कारखान्यात ऊस देता यावा, यासाठी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट करून, शेतकऱ्यांच्या उसाला शाश्वत भाव मिळेल असे स्पष्ट आश्वासन भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले. तुळजापूर शुगर प्रा. लि. च्या गूळ पावडर कारखान्याचा मोळी पूजन माजी आमदार सुजितसिंह ठाकूर आणि तुळजाभवानी मंदिराचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांच्या हस्ते करण्यात आले. 

ॲड. अनिल काळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कारखान्याचे संचालक आदित्य काळे व ऋषी वडगावकर यांनीही खूप परिश्रम घेतल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्यास प्रमुख मान्यवर म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, हनुमंत मडके, दत्ताभाऊ कुलकर्णी, सुधीर पाटील, विनोद गपाट, प्रवीण पाठक, राम गरड, डॉ. मनोज घोगरे, नागेश नाईक, गुलचंद व्यवहारे, डॉ. कोकाटे, संजय पटवारी, राजकुमार पाटील, प्रभाकर मुळे, सुहास साळुंके, विकास मलबा, सागर पारडे आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी संताजी चालुक्य, हणमंत मडके, तुळजाभवानी देवीचे मुख्य महंत तुकोजी बुवा यांनीही कारखान्याचे चेअरमन यांना शुभेच्छा दिल्या.

 
Top