उमरगा (प्रतिनिधी)- उमरगा-लोहारा विधानसभा मतदारसंघात  शिवसेना महायुतीचे उमेदवार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रचारार्थ मुरूम मध्ये  प्रचाराच्या शेवटच्या दिवशी सोमवारी सकाळी मोठी प्रचार रॅली करण्यात आली. या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. यावेळी मुरूम शहरातील  नागरिकांनी  प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा संकल्प केला. प्रचारात मोठी आघाडी घेतलेल्या  शिवसेना महायुतीला  या रॅलीमुळे वातावरण अधिक महायुतीमय झाले होते.

सोमवारी  मुरूम लोहारा उमरगा शहरात मुख्य मार्गावर विविध भागात रॅली काढण्यात आली. यावेळी प्रमुख मान्यवरांची उपस्थिती होती.मुरूम व उमरगा शहरात रॅली पोहोचल्यानंतर सभेत रूपांतर झाले. यावेळी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी बोलताना सांगितले की, फेरीवाले भाजीविक्रेते, फळविक्रेते यांच्याकरीता व्यापारी संकुल बांधुन, भाजीमंडई करून देणार.  महिलासंक्षमीकरण अंतर्गत महिला स्वयंसहाय्या बचतगटांना शासकिय योजनांचा लाभ मिळवून देणार.  एमआयडीसीला मधे कायमस्वरूपी पाणी पुरवठा करून नवीन उद्योग व्यवसायाला चालना देवून रोजगार निर्मीती करणार व लोहारा येथे एमआयडीसी मंजूर करून घेणार. 

मतदारसंघातील शैक्षणिक संस्था व शासकिय शाळांना शासकिय मदत देवून सर्वांगीण विकास करणार. माकणी येथून मंजूर असलेली उमरगा व लोहारा तसेच ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजना कार्यान्वयीत करणार. धाकटे पंढरपुर म्हणून परिचीत असलेले माकणी डॅम जवळ पर्यटनस्थळ विकसीत करणार.  उमरगा, मुरूम बसस्थानकास मंजूर निधीतून कामे पुर्णत्वास नेणार, येणेगुर लोहारा, माकणी येथील बसस्थानकात विविध सुविधा उपलब्ध करून देणार.  मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते, पाणी, सभागृह, हायमस्ट लॅम्प आदी सुविधा उपलब्ध करून देणार.मागासवर्गीय वस्तीमध्ये रस्ते, पाणी, सभागृह, हायमस्ट लॅम्प आदी सुविधा उपलब्ध करून देणार. मतदार संघातील सर्व आरोग्य उपकेंद्रात अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देणार, उमरगा व लोहारा येथे स्वतंत्र महिला रूग्णालय करणार. मराठा समाजातील होतकरू लघुउद्योजकासाठी आण्णासाहेब पाटील महामंडळाचे लक्षांक वाढवून घेणार. 

कृष्णा खोऱ्याचे मराठवाड्याचे 21 पाणी अंतर्गत रामदरा ते एकुरगा टप्पा क्र 6 काम पुर्णत्वास आले असून पुढील काही महिन्यातच शेतकऱ्याना शेतीसाठी शाश्वत पाणी उपलब्ध करून  देणार बेन्नीतुरा नदीचे कर्नाटक राज्यात वाहून जाणारे पाणी आडवण्यासाठी स्वतंत्र उपाययोजना करणार तसेच कोळसुर पाटबंधारे ते तुरोरी मध्यम प्रकल्प जोडकालव्याची दुरूस्ती करून पाणी पुरवठार सुरळीत करून घेणार. गेल्या पाच वर्षात तुम्ही माझ्यावर विश्वास टाकला सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. कोणत्याही लबाडांच्या नादी लागू नका. आपल्या मतांचे विभाजन होऊ देऊ नका. विरोधी उमेदवारावर टीका करताना सांगितले की, शिवसेनेची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष संबंध नसलेले  उमेदवार आहे. मागील काळात केलेल्या विकास कामामुळे माझा विजय निश्चित आहे.त्यामुळे आपली सेवा करण्यासाठी मला परत एकदा संधी देण्याचे  भावनिक आवाहन आ.  चौगुले यांनी यावेळी केले.यावेळी  महायुती मधील  शिवसेना, राष्ट्रवादी  काँग्रेस अजित पवार गट, लहुजी क्रांती सेना सह महायुतीतील सर्व घटक पक्ष पदाधिकारी उपस्थित होते.

 
Top